पीक कर्जाची ५२ टक्के वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:35 AM2021-03-19T04:35:53+5:302021-03-19T04:35:53+5:30
२०२०-२१ या खरीप हंगामात जिल्हा बॅंकेमार्फत १९ हजार ८३८ शेतकऱ्यांना ६२ काेटी ७३ लाख रुपयांच्या कर्जाचे वितरण केले हाेते. ...
२०२०-२१ या खरीप हंगामात जिल्हा बॅंकेमार्फत १९ हजार ८३८ शेतकऱ्यांना ६२ काेटी ७३ लाख रुपयांच्या कर्जाचे वितरण केले हाेते. त्यापैकी १७ मार्चपर्यंत ३२ काेटी ३५ लाख रुपयांचा भरणा शेतकऱ्यांनी केला आहे. कर्ज भरण्यासाठी पुन्हा १३ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत पुन्हा कर्जाचा भरणा हाेऊन एकूण वसुली ९० टक्क्यांपर्यंत पाेहाेचण्याची शक्यता आहे.
काेट
३१ मार्चपूर्वी पीक कर्ज भरल्यास संबंधित शेतकऱ्याला केवळ कर्जाची मुद्दल रक्कम भरावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा करावा. जे शेतकरी कर्जाचा भरणा करतात, त्यांना कर्ज वितरणाची प्रक्रिया एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरू हाेते. ३१ मार्चनंतर कर्ज भरल्यास व्याज सवलत याेजनेसाठी संबंधित शेतकरी पात्र ठरत नाही. तसेच कर्जही मिळण्यास उशीर हाेतो. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी कर्जाच्या वसुलीचे प्रमाण अधिक असून, ९५ टक्क्यांपर्यंत कर्ज वसुली हाेईल, अशी अपेक्षा आहे.
- सतीश आयलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, गडचिराेली
बाॅक्स
तालुकानिहाय पीक कर्ज वसुली (आकडे लाखांत)
तालुका शेतकरी वाटप वसुली
काेरची ९७६ २९२.६१ १७७.०८
कुरखेडा २५७६ ८३८.७० ४५७.३२
देसाईगंज ८५९ २७१.६८ १२३.४१
धानाेरा १६५४ ४४३.२७ २२७.८४
आरमाेरी २२७८ ६८०.१४ ३३४.६३
गडचिराेली २०१७ ६०२.६२ २९२.४८
चामाेर्शी ५८२५ १८९३.३१ ९८९.०७
मुलचेरा ७८७ २४०.७२ ११६.६३
अहेरी ११७८ ४५४.४७ २४५.४१
भामरागड ३१६ १००.२४ ४८.२०
एटापल्ली ५८३ १९४.८० १०३.४८
सिराेंचा ७८९ २६०.५८ ११९.२९
एकूण १९८३८ ६२७३.१४ ३२३५.८३