550 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2022 10:10 PM2022-11-13T22:10:37+5:302022-11-13T22:11:09+5:30
तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, १३८ एन.आय. ॲक्ट प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बॅंकेशी संबंधित प्रकरणे वाद दाखलपूर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन, मोबाईल कंपनी संबंधित वाद, महावितरणची प्रकरणे, पतसंस्थेशी संबंधित प्रकरणे, नगर परिषद अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे निकाली काढली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्हाभरातील न्यायालयांमध्ये १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लाेकअदालतीचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात दाखलपूर्व ५५० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. २ काेटी १९ लाख २५ हजार ६३५ रुपयांची वसुली करण्यात आली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष यू.बी. शुक्ल व सचिव आर.आर. पाटील यांच्या देखरेखीखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू.एम. मुधोळकर यांनी पॅनल क्र.१ वर काम पाहिले. पॅनल क्र.२ वर दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा मुख्य न्याय दंडाधिकारी एम. आर. वाशिमकर तर पॅनल क्रं. ३ वर सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) सी.पी. रघुवंशी यांनी काम पाहिले.
पॅनल क्र. ४ वर तृतीय सहदिवाणी न्यायाधीश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.)एन.सी. सोरते यांनी काम पाहिले. तसेच वाहतुकीचे नियम भंग केल्याप्रकरणी ऑनलाईन चालान रक्कम स्वीकारण्याकरिता पोलीस विभागातर्फे व्यवस्था करण्यात आलेली होती.
तसेच पॅनल क्रमांक १ मध्ये पॅनल सदस्य म्हणून विधी स्वयंसेवक प्रा. गौतम जी. डांगे, पॅनल क्रमांक २ मध्ये पॅनल सदस्य म्हणून अकील शेख, पॅनल क्रमांक ३ मध्ये पॅनल सदस्य म्हणून अर्चना चुधरी आणि पॅनल क्र. ४ मध्ये सुरेखा बारसागडे यांनी काम केले.
सदर लोकन्यायालय यशस्वी करण्याकरिता गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष रवींद्र दोनाडकर, जिल्हा वकील संघाचे ज्येष्ठ अधिवक्ता यांनी सहकार्य केले.
या प्रकरणांचा झाला निपटारा
तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, १३८ एन.आय. ॲक्ट प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बॅंकेशी संबंधित प्रकरणे वाद दाखलपूर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन, मोबाईल कंपनी संबंधित वाद, महावितरणची प्रकरणे, पतसंस्थेशी संबंधित प्रकरणे, नगर परिषद अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे निकाली काढली. किरकोळ स्वरूपाच्या मामल्यांकरिता स्पशेल ड्रायव्हरद्वारे एकूण ३९ प्रकरणे निकाली काढण्यात आली.