५५० एनआरएचएम कर्मचारी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 11:36 PM2018-05-17T23:36:39+5:302018-05-17T23:36:39+5:30

१८ ते २८ मेदरम्यान नाशिक ते मुंबईपर्यंत एनआरएचएम कर्मचाऱ्यांच्या वतीने लाँग मार्च काढला जाणार आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ८६२ एनआरएचएम कर्मचारी व अधिकाऱ्यांपैकी जवळपास ५५० जण नाशिकसाठी रवाना झाले आहेत.

550 NRHM employees left | ५५० एनआरएचएम कर्मचारी रवाना

५५० एनआरएचएम कर्मचारी रवाना

Next
ठळक मुद्देसेवेत कायम करा : १८ ते २८ मे दरम्यान नाशिक ते मुंबई लाँग मार्च

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : १८ ते २८ मेदरम्यान नाशिक ते मुंबईपर्यंत एनआरएचएम कर्मचाऱ्यांच्या वतीने लाँग मार्च काढला जाणार आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ८६२ एनआरएचएम कर्मचारी व अधिकाऱ्यांपैकी जवळपास ५५० जण नाशिकसाठी रवाना झाले आहेत.
एनआरएचएममध्ये मागील अनेक वर्षांपासून कर्मचारी कंत्राटी तत्वावर काम करीत आहेत. सेवेत कायम करावे, या मागणीसाठी एनआरएचएम कर्मचाऱ्यांचे ८ मे पासून कामबंद आंदोलन सुरू केले. मात्र शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. एवढेच नाही तर कामावर रूजू न झाल्यास त्यांना कामावरून काढून टाकण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले. या आदेशाला न जुमानता जिल्हाभरातील एकही कर्मचारी कामावर रूजू झाला नाही. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी १८ ते २८ मे या कालावधीत नाशिक ते मुंबईदरम्यान लाँग मार्च काढला जाणार आहे.
या लाँगमार्चमध्ये राज्यभरातील हजारो एनआरएचएम कर्मचारी सहभागी होणार आहेत. गडचिरोली येथून बुधवारी जवळपास ४०० व गुरूवारी जवळपास १५० कर्मचारी नाशिकसाठी रवाना झाले. मुंबई येथे धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे.

Web Title: 550 NRHM employees left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.