५६ अंगणवाडीसेविका व मदतनिस पेन्शनपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:34 AM2021-03-06T04:34:52+5:302021-03-06T04:34:52+5:30
एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अगणवाडीसेविका मदतनिस, मिनी अंगणवाडीसेविका या मानधन कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा त्यांनी राजीनामा दिला अथवा मृत्यू झाल्यानंतर ...
एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अगणवाडीसेविका मदतनिस, मिनी अंगणवाडीसेविका या मानधन कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा त्यांनी राजीनामा दिला अथवा मृत्यू झाल्यानंतर लाभ देण्यासाठी ३ जुलै, २०१४ पासून राज्यात योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अंगणवाडी सेविकांना १ लाख रुपये, तर अंगणवाडी मदतनिसांना ७५ हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येत आहे. त्यानुसार, कुरखेडा तालुक्यातील ५६ अंगणवाडीसेविका मदतानिसांचे सेवानिवृत्ती, राजीनामा व मयत झालेल्यांचे प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आले. त्यानंतर, ऑनलाइनही करण्यात आले. मात्र, अद्यापही लाभ मिळाला नाही. या समस्यांकडे संबंधित कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे सदर अंगणवाडीसेविका व मदतनीस यांची रक्कम प्रलंबित आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत पेन्शनचा लाभ द्यावा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता युवामोर्चा जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.