५८ लाख ८३ हजारांचा दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:48 AM2019-03-18T00:48:04+5:302019-03-18T00:48:37+5:30
कोटगूल पोलीस मदत केंद्राच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील खुर्शीपार येथे धाड टाकून सुमारे ५८ लाख ८३ हजार ४५० रुपयांची दारू जप्त केली आहे. सदर कारवाई १६ मार्च रोजी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोटगूल पोलीस मदत केंद्राच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील खुर्शीपार येथे धाड टाकून सुमारे ५८ लाख ८३ हजार ४५० रुपयांची दारू जप्त केली आहे. सदर कारवाई १६ मार्च रोजी करण्यात आली.
खुर्शीपार येथील तिलक बाबुराव उंदीरवाडे (३४) हा आपल्या राहत्या घरी दारूची विक्री करीत आहे. सदर दारू कोरची येथील निर्मल धमगाये, ममता निर्मल धमगाये व नितीन उर्फत तरूण निर्मल धमगाये सर्व रा. कोरची यांनी उंदीरवाडे याच्याकडे २० दिवसांपूर्वी किरकोळ व ठोक विक्रीसाठी आणून ठेवली असल्याची गोपनिय माहिती कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांना प्राप्त झाली. कोटगूल पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक तुषार सूर्यकांत भोसले यांच्या पथकाने उंदीरवाडे याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरी २५ हजार ५० रुपये किंमतीची दारू आढळून आली. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या तुलनेत उंदीरवाडे याच्या घरी अत्यंत कमी प्रमाणात दारू आढळून आली. उंदीरवाडे याच्याकडे अधिक विचारणा केली असता, उर्वरित दारूसाठा केवळराम तुलावी याच्या घरी ठेवला असल्याचे सांगितले. केवळराम तुलावीच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या पडक्या कवेलुच्या घरात सुमारे ५८ हजार ५८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. दोघांकडे आढळलेल्या एकूण मालाची किंमत ५८ लाख ८३ हजार ४५० रुपये होते. पोलिसांनी निर्मल धमगाये, ममता धमगाये, तिलक उंदीरवाडे, नितीन धमगाये यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.