६ हजार १७४ घरकूल अपूर्ण
By Admin | Published: October 19, 2015 02:00 AM2015-10-19T02:00:30+5:302015-10-19T02:00:30+5:30
इंदिरा आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात बाराही तालुक्यात उद्दिष्टांइतकेच ७ हजार ७९४ घरकूल मंजूर करण्यात आले.
काम ढेपाळले : १६३ घरकुल बांधकामाला प्रारंभच नाही
गडचिरोली : इंदिरा आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात बाराही तालुक्यात उद्दिष्टांइतकेच ७ हजार ७९४ घरकूल मंजूर करण्यात आले. यापैकी आतापर्यंत केवळ १ हजार ४५७ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून तब्बल ६ हजार १७४ घरकूल अपूर्ण स्थितीत आहेत. विशेष म्हणजे १६३ घरकुलांच्या बांधकामाला अद्यापही प्रारंभच झाला नसल्याची धक्कादायक माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. एकूणच जिल्ह्यात घरकूल बांधणीचे काम ढेपाळले असल्याचे दिसून येते.
आरमोरी तालुक्यात ४५४ मंजूर घरकुलांपैकी १९२ घरकुलाचे काम पूर्ण झाले असून २६२ घरकूल अपूर्ण आहेत. चामोर्शी तालुक्यात ६३६ घरकुलांपैकी केवळ ५२ घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले असून ५५१ घरकूल अपूर्ण आहेत. धानोरा तालुक्यात ९७४ घरकुलांपैकी १४९ घरकूल पूर्ण करण्यात आले असून ८२२ घरकूल अपूर्ण आहेत. एटापल्ली तालुक्यात ५३६ घरकुलांपैकी ३६ घरकूल पूर्ण झाले असून ५०० घरकूल अपूर्ण आहेत. गडचिरोली तालुक्यात ४५२ घरकुलांपैकी २७१ घरकूल पूर्ण झाले असून १८१ घरकूल अपूर्ण आहेत.
कोरची तालुक्यात ६९४ घरकुलांपैकी १०८ घरकूल पूर्ण करण्यात आले असून ५८६ घरकूल अपूर्ण आहेत. कुरखेडा तालुक्यात ९०८ घरकुलांपैकी ३५२ घरकूल पूर्ण झाले असून ५५६ घरकूल अपूर्ण आहेत. मुलचेरा तालुक्यात ३१९ घरकुलांपैकी १०१ घरकूल पूर्ण झाले असून २१८ घरकूल अपूर्ण आहेत. देसाईगंज तालुक्यात ९२ घरकुलांपैकी ५६ घरकूल पूर्ण झाले असून ३६ घरकूल अपूर्ण आहेत तर सिरोंचा तालुक्यात एकूण ७०० घरकुलांपैकी ११७ घरकूल पूर्ण झाले असून तब्बल ५७८ घरकूल अपूर्ण स्थितीत आहेत. पहिल्या हफ्त्याचे अनुदान देऊनही लाभार्थी घरकूल बांधकामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने जिल्ह्यात घरकूल बांधकामाची गती प्रचंड मंदावली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)