६० घरांवरील कवेलू व टिनपत्रे उडाले
By admin | Published: June 5, 2016 01:15 AM2016-06-05T01:15:28+5:302016-06-05T01:15:28+5:30
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा परिसरात शनिवारी जोरदार वादळासह पाऊस बरसला.
वादळी पावसाचा तडाखा : जिमलगट्टा येथे अनेकांचे नुकसान; विद्युत पुरवठाही खंडित
जिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा परिसरात शनिवारी जोरदार वादळासह पाऊस बरसला. वादळामुळे जिमलगट्टा, रसपेल्ली व माल्लागुड्डम येथे ५० ते ६० घरांवरील कवेलू टिनपत्रे उडाली. यामुळे अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले.
वादळामुळे सिरोंचा मार्गावर मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली. तसेच वादळामुळे अनेक ठिकाणचे खांब वाकल्यामुळे तसेच वीज तारा तुटल्यामुळे जिमलगट्टा भागातील अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला. जिमलगट्टा परिसरात जवळपास एक तास जोरदार पाऊस बरसला. घरांवरील कवेलू व टिनपत्रे उडाल्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले. प्रशासनाने नुकसानग्रस्त घरांचे तत्काळ पंचनामे करून शासनाकडून आर्थिक मदत मिळण्यासंदर्भात कार्यवाही करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांनी केली आहे. पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. (वार्ताहर)