जिमलगट्टावासीयांची राष्ट्रीय बँकेसाठी ६० कि.मीं.ची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:39 AM2021-03-23T04:39:02+5:302021-03-23T04:39:02+5:30

जिमलगट्टा : जिमलगट्टा परिसरात एकही राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने येथील नागरिकांना राष्ट्रीयीकृत बँकेतून एखादे काम करायचे असल्यास ६० कि.मी. ...

60 km pipeline for Jimalgatta residents for National Bank | जिमलगट्टावासीयांची राष्ट्रीय बँकेसाठी ६० कि.मीं.ची पायपीट

जिमलगट्टावासीयांची राष्ट्रीय बँकेसाठी ६० कि.मीं.ची पायपीट

Next

जिमलगट्टा : जिमलगट्टा परिसरात एकही राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने येथील नागरिकांना राष्ट्रीयीकृत बँकेतून एखादे काम करायचे असल्यास ६० कि.मी. अंतरावर असलेल्या तालुकास्थळी जावे लागते.

जिमलगट्टा परिसरात ६०च्या जवळपास गावे आहेत. जिमलगट्टापासून काही गावे पुन्हा ४० कि.मी. अंतरावर आहेत. या गावातील नागरिकांना अहेरी येथे येण्यासाठी सुमारे १०० कि.मी.चे अंतर पार करावे लागते. जिमलगट्टा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एक शाखा आहे. या शाखेत ४० कि.मी. व्यासाच्या परिसरातील नागरिकांची शेकडाे बँक खाते आहेत. त्यामुळे या बँकेत सकाळपासूनच नागरिकांची गर्दी राहते. त्यामुळे सकाळी आल्यानंतर दुपारी उशिरापर्यंत त्यांचे बँकेचे व्यवहार पूर्ण हाेतात. सायंकाळी गावाला जाणे शक्य हाेत नाही. त्यामुळे जिमलगट्टा येथेच मुक्काम करावा लागते. परिसराचा व्याप व खातेदारांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी पुन्हा एक मध्यवर्ती बँक असणे आवश्यक आहे.

काही कामे राष्ट्रीयीकृत बँकेतूनच पूर्ण हाेतात; मात्र जिमलगट्टा व परिसरातील एकाही गावामध्ये राष्ट्रीयीकृत बँका नाही. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकेतून एखादे काम करायचे असल्यास नागरिकांना अहेरी येथे गेल्याशिवाय पर्याय राहत नाही. ६० ते १०० कि.मी.चे अंतर गाठून बँकेचे काम करणे व गावाला त्याच दिवशी परत येणे शक्य हाेत नाही. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकेशी संबंधित असलेले काम रखडते. या परिसरात राष्ट्रीयीकृत बँक स्थापन करावी, यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. मात्र, अजूनपर्यंत राष्ट्रीयीकृत बँकेची स्थापना करण्यात आली नाही.

Web Title: 60 km pipeline for Jimalgatta residents for National Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.