६२ कैद्यांनी गिरविले स्वयंरोजगाराचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 11:14 PM2017-09-16T23:14:26+5:302017-09-16T23:14:49+5:30

ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा संचालित बँक आॅफ इंडिया द्वारा प्रायोजित स्टार स्वयंरोजगार संस्था गडचिरोलीच्या वतीने .....

62 Lessons of Self-Employment, Fallen by Prisoners | ६२ कैद्यांनी गिरविले स्वयंरोजगाराचे धडे

६२ कैद्यांनी गिरविले स्वयंरोजगाराचे धडे

Next
ठळक मुद्देभाजीपाला लागवड व मत्स्य व्यवसायाचे तंत्रही जाणले : तज्ज्ञांनी केले व्यवसायावर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा संचालित बँक आॅफ इंडिया द्वारा प्रायोजित स्टार स्वयंरोजगार संस्था गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी स्थानिक जिल्हा कारागृहात स्वयंरोजगाराच्या दृष्टीकोणातून प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी खुल्या कारागृहातील ६२ कैद्यांनी भाजीपाला लागवड, व्यवस्थापन व मत्स्य व्यवसायाचे धडे गिरविले.
सदर दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप शुक्रवारी झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून कारागृह अधीक्षक डी. एस. आळे, बाळराजेंद्र निमगडे, संस्थेचे संचालक एस. पी. टेकाम, कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ डॉ. पुष्पक बोथीकर, डॉ. अनिल तारू, जिल्हा मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी प्रशांत वैद्य, यशस्वी उद्योजग शारदा सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी जिल्हा विधी व न्याय सेवा प्राधिकरणाच्या वतीने येथील कैद्यांसाठी कायदा विषयक शिक्षण शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाला कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम, पी. डी. काटकर यांच्यासह कारागृहातील कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी कैद्यांनीही भाजीपाला लागवड व मत्स्य व्यवसायाबाबत तज्ज्ञांशी मोकळेपणे संवाद साधला.
सन्मानाने जगून आर्थिक स्थैर्य मिळवा -नेते
यावेळी खासदार अशोक नेते यांनी कैद्यांना मार्गदर्शन केले. येथे घेतलेल्या प्रशिक्षणाचा कैद्यांनी पूर्ण उपयोग केला पाहिजे. कैद्यांनाही माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कैद्यांनी सन्मानाने जगून स्वयंरोजगारातून आपल्या कुटुंबाला आर्थिक स्वायतता मिळवून द्यावी, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले. कैद्यांनी पुस्तक वाचनातून चांगले विचार आत्मसात करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी एस. पी. टेकाम, डॉ. पुष्पक बोथीकर, डॉ. अनिल तारू, प्रशांत वैद्य यांनीही कैद्यांना स्वयंरोजगार व व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी कैद्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

Web Title: 62 Lessons of Self-Employment, Fallen by Prisoners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.