आरटीई प्रवेशासाठी यावर्षी ६२४ जागा राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 05:00 AM2021-03-07T05:00:00+5:302021-03-06T23:30:43+5:30
यावर्षी जिल्हाभरातील ७६ शाळांमध्ये ६२४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ३ मार्चपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी अर्ज करावे, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांच्या बालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला जाते. जिल्हाभरातील ७६ शाळांनी ६२४ जागा आरटीई प्रवेशासाठी रिक्त ठेवल्या आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार (आरटीई) दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. यावर्षी जिल्हाभरातील ७६ शाळांमध्ये ६२४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ३ मार्चपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी अर्ज करावे, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांच्या बालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला जाते. जिल्हाभरातील ७६ शाळांनी ६२४ जागा आरटीई प्रवेशासाठी रिक्त ठेवल्या आहेत. यामध्ये गडचिराेली तालुक्यातील १४ शाळांमध्ये ९३ जागा, आरमाेरी तालुक्यातील ४ शाळांमध्ये ५१ जागा, कुरखेडा तालुक्यातील ८ शाळांमध्ये ४० जागा, धानाेरातील ३ शाळांमध्ये २४ जागा, चामाेर्शीतील १० शाळांमध्ये ७२ जागा, अहेरीतील १० शाळांमध्ये ५६ जागा, एटापल्लीतील दाेन शाळांमध्ये २५ जागा, सिराेंचा तालुक्यातील सात शाळांमध्ये ९८ जागा, मुलचेरा तालुक्यातील चार शाळांमध्ये ४४ जागा, काेरची तालुक्यातील तीन शाळांमध्ये २६ जागा व देसाईगंज तालुक्यातील ११ शाळांमध्ये ९५ जागा राखीव ठेवल्या आहेत.
विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी आधारकार्ड, जन्मतारखेचा दाखला, रहिवासी दाखला, निवासी पुरावा, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. निवासासंदर्भात रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल, टेलिफाेन बिल, प्राॅपर्टी टॅक्स, घर टॅक्स, बॅंक पासबुक आदी पुरावे ग्राह्य धरले जातील.
आर्थिकदुर्बल घटकातील मुलांचे शिक्षण नामांकित शाळांमध्ये हाेण्यासाठी सरकारकडून ही याेजना राबविली जाते.
चुकीची माहिती भरल्यास प्रवेश हाेणार रद्द
अर्ज करतेवेळी काेणतीही कागदपत्रे मागितली जात नाहीत. केवळ ऑनलाईन अर्जावर विश्वास ठेवून लाॅटरी काढली जाते. काही पालक चुकीचा पत्ता, चुकीचे उत्पन्न दाखवितात. विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २० सदस्यांची समिती गठीत केली जाणार आहे. या समितीमार्फत प्रवेश घेतवेळी कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान अर्जात भरलेली माहिती व प्रत्यक्ष कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास त्याचा प्रवेश रद्द केला जाणार आहे. त्यामुळे चुकीची माहिती भरू नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.