65 सदस्य बिनविराेध, तर 61 जण मतदानातून विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 05:00 AM2021-12-24T05:00:00+5:302021-12-24T05:00:59+5:30
गडचिराेली तालुक्यात १० ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक पार पडली. धुंडेशिवणी ग्रामपंचायतीत सर्वसाधारण गटातून श्रीधर काशिनाथ शेजारे हे निवडून आले. मुडझा ग्रामपंचायतीत यश्वदा राेहिदास कुळमेथे, निरूता संजय सुरपाम या बिनविराेध निवडून आल्या आहेत. मरेगाव ग्रामपंचायतीत नितीन सुखदेव टेकाम, नंदाबाई धनंजय टेकाम या बिनविराेध निवडून आल्या आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींच्या पाेटनिवडणुकीसाठी २१ डिसेंबर राेजी मतदान घेण्यात आले. यात ६५ जणांची बिनविराेध निवड झाली आहे, तर ६१ जण बिनविराेध निवडून आले आहेत.
गडचिराेली तालुक्यात १० ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक पार पडली. धुंडेशिवणी ग्रामपंचायतीत सर्वसाधारण गटातून श्रीधर काशिनाथ शेजारे हे निवडून आले. मुडझा ग्रामपंचायतीत यश्वदा राेहिदास कुळमेथे, निरूता संजय सुरपाम या बिनविराेध निवडून आल्या आहेत. मरेगाव ग्रामपंचायतीत नितीन सुखदेव टेकाम, नंदाबाई धनंजय टेकाम या बिनविराेध निवडून आल्या आहेत. देवापूर ग्रामपंचायतीत देवराव तानू हिचामी हे बिनविराेध निवडून आले. चुरचुरा येथे ज्याेती रवींद्र मडावी या बिनविराेध निवडून आल्या. मुरमाडीत प्रकाश बाळकृष्ण बाेरकर, कनेरीत रेवनाथ माेतिराम कुकुडकर, तुकाराम लालाजी मडावी, पुलखल येथे कविता भास्कर ठाकरे, जिजाबाई साेमाजी आलाम, जेप्रात गुणवंत हाेमराज जम्बेवार, खरपुंडीत वामन देविदास टिकले यांनी विजय प्राप्त केला आहे.
कुरखेडा तालुक्यात १२ उमेदवार अविराेध
कुरखेडा तालुक्यात १३ ग्रामपंचायतीच्या १९ रिक्त सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपप्रणित पॅनलने सरशी मिळविली. ४ ग्रामपंचायतीच्या ७ जागांकरिता निवडणूक झाल्यानंतर गुरुवारी येथील तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली, तर ९ ग्रामपंचायतमधील रिक्त १२ जागेवर अविरोध निवड झाली. घाटी येथे पंढरी मडावी,हर्षलता लाडे,काशीनाथ तलांडे हे निवडून आले तर वडेगाव येथील एका जागेवर धर्मराज कुंवर, मालेवाडा येथे आनंद बोगा, रोहिदास गुरनुले, सोनेरांगी येथे वैशाली सहारे, सोनपूर आंधळी येथून निर्मला गावळे, सावलखेडा येथे मयुरी कुंभरे व रेखा उईके, खरकाडा येथून ज्योती कोकोडे, चिनेगाव येथे कुंदा कुमरे, भगवानपूर येथून पुष्पा गरमळे, चांदागड येथे सगुणाबाई पुराम, बांधगाव येथे जगदीश वड्डे, चिखली येथे मनिषा बसोना, खोब्रामेंढा येथून जास्वंदा धुर्वे व रामसिंग कल्लो यांची अविरोध निवड झाली. निवडणुकीचा निकाल जाहीर हाेताच भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, भाजप तालुकाध्यक्ष नाजुक पुराम, प्रा.नागेश फाये, ॲड. उमेश वालदे, उध्दवराव गहाणे यांच्यासह कार्यकर्त्यानी जल्लोष केला.
आरमाेरी तालुक्यातील ग्रामपंचायतींवर भाजपचा कब्जा
आरमाेरी तालुक्यातील डाेंगरगाव येथील उमेदवार अल्का कुमरे व पळसगाव येथील चांगदेव दडमल हे दाेन्ही भाजप समर्थीत उमेदवार निवडून आले आहेत. ही निवडणूक प्रकाश पाेरेड्डीवार यांच्या नेतृत्वात लढण्यात आली. विजयी उमेदवारांचे आमदार कृष्णा गजबे, भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, सदानंद कुथे, नंदू पेटवार, पंकज खरवडे, भारत बावनथडे, प्रल्हाद नखाते, राधेश्याम ठेंगरी यांनी अभिनंदन केले आहे.
चामाेर्शी : तालुक्यात कुरूड येथे दीपिका जितेंद्र उईके, साेनापूरमध्ये दीपाली प्रमाेद मेश्राम या विजयी झाल्या. जयरामपूर येथे कल्पना दादाजी तलांडे, सगनापूर येथे नीकिता प्रकाश गेडाम, मुरखळा मालमध्ये पुष्पा रमेश गव्हारे, माडेआमगावमध्ये गिरिजाबाई पुरुषाेत्तम नराेटे, पुष्पा सुधाकर तिम्मा, रसिका साेमाजी माेहंदा, साेमनपल्लीत शीतल माराेती अवथरे हे बिनविराेध निवडून आले आहेत. चामाेर्शी तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये अतिशय चुरशीच्या लढती झाल्या. त्यामुळे निकालाची उत्सुकता मतदारांना हाेती.
काेरची : तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायतीत चरणदास सीताराम उंदीरवाडे, बेतकाठीत भारतीबाई महेश नैताम, बेडगाव येथे लीलाबाई मयाराम ताडामी, यशवंत रामजी वाळके यांनी विजय प्राप्त केला आहे.
मुलचेरा : तालुक्यातील लगाम माल ग्रामपंचायतीमध्ये शैला पुरुषाेत्तम मडावी या निवडून आल्या.
देसाईगंज : तालुक्यातील आमगाव ग्रामपंचायतीत साेनल धर्मराज घाेरमाेडे या निवडून आल्या आहेत. त्यांना ४२४ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी नंदीताई नरेंद्र ढाेरे यांना २१९ मते मिळाली.
सिराेंचा : तालुक्यातील ९ जागांवर बिनविराेध निवड झाली आहे; तर सात जागांसाठी मतदान पार पडले.
एटापल्ली : तालुक्यात घाेटसूर येथे चिंता बाेटू काेरामी, बेबी प्रमाेद हेडाे, गर्देवाडात संध्या माणिक नराेटे, राेशनी रमेश महा, मानेवारात नानसू दसरू नराेटे, सुनीता काेरामी, रानू हेडाे, देविदास मट्टामी, माधुरी हिचामी, सेवारीत संध्या गेडाम, कांदाेळीत लता भीमा गावडे या बिनविराेध निवडून आल्या आहेत. दुर्गम भागातील नागरिक निवडणूक लढण्यास तयार हाेत नाही.
आरमाेरी : तालुक्यातील डाेंगरगाव भुजमध्ये अल्का कुमरे, माेहझरीत माेतिराम जनार्धन बावणे, पळसगाव येथे चांगदेव जगदीश दडमल, धम्मदीप प्रमाेद घुटके यांनी विजय मिळविला आहे. किटाळीत पल्लवी रामचंद्र मेश्राम, कासवीत पूजा अरविंद गुरनुले, पिसेवडधात रेवता गिरिधर आत्राम, कुलकुलीत याेगेश्वर यादाेजी मसराम हे बिनविराेध निवडून आले आहेत.
अहेरी : तालुक्यातील खमनचेरू येथे शेवंता चंद्रा सुंके, यास्मिन धनराज दुर्गे, आकाश पेंदाम, किष्टापूर वेलतूरमध्ये दादाराव मडावी, मेडपल्लीत कमला पेंदाम, देवलमरीत महेश लेकूर, राजाराममध्ये सत्यवान आलाम, प्रिया पाेरतेट, पुष्पा ताेरेम, सूर्यकांत आत्राम, नागेश कन्नाके, सपना तलांडे, रेपनपल्लीत पूजा माहुलकर, येडमपल्लीत तुलसी निलम, मरपल्लीत कमला मडावी, सुजाता मुडमाडीगेला, पेठात यशाेदा वेलादी, लक्ष्मी वेलादी हे निवडून आले आहेत. कमलापुरात रजनीता मडावी, वासुदेव सिडाम, माराेती मडावी हे बिनविराेध निवडून आले आहेत.
धानाेरा : तालुक्यात ३० ग्रामपंचायतींमधील ८१ जागांसाठी पाेटनिवडणूक घेण्यात आली. त्यापैकी ५९ जागांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. १३ सदस्य बिनविराेध निवडून आले, तर ९ जणांनी निवडणूक लढून विजय प्राप्त केला. बिनविराेध आलेल्यांमध्ये चिचाेली ग्रामपंचायतीमधील मैना मधुकर काेरचा, निमगावात निशा तुकाराम हलामी, अंबरशाहा शिवराम हलामी, माेहगाव येथे सुरेश सन्नु नराेटे, गणपत जिगू धुर्वे, चिचाेडात अशाेक काऱ्या आतला, दानसूर बैजू उसेंडी, प्रियंका काऱ्या आतला, छाया काऱ्या आतला, गिराेलात पाैर्णिमा सुरेश मडावी, सावंगा बूजमध्ये रंजिता सुखरू नैताम, कुलभट्टीत ज्याेती श्रीराम उसेंडी, सुरसुंडीत शेवंता शेषराव नैताम यांचा समावेश आहे. चिचाेलीत विजय नेवाजी गाेटा, गिराेलात दिलीप शंकर मडावी, येरकडमध्ये देवराव शंकर नराेटे, ममता सुधाकर आचला, काेंदावाहीत अरविंद काजू वेळदा, शशिकला रैनू पदा, दीपाली दाैलत उसेंडी, मंगला विठ्ठल उसेंडी, माेहलीत धर्मेंद्र शिवराव कुमाेटी हे बिनविराेध निवडून आले आहेत. धानाेरा तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेण्यात आली. मतदानाच्या वेळी मतदारांमध्ये उत्साह असल्याचे दिसून येत हाेते. निकालानंतर जल्लाेष केला.