६५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

By Admin | Published: May 21, 2016 01:16 AM2016-05-21T01:16:22+5:302016-05-21T01:16:22+5:30

सर्व शिक्षा अभियानांतर्गत १ ते ८ पर्यंत शिकणाऱ्या सर्व मुली, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व बीपीएलधारक पालकांची

65,000 students get uniforms | ६५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

६५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

googlenewsNext

प्रती विद्यार्थी दोन गणवेश : २ कोटी ६१ लाखांचा खर्च
गडचिरोली : सर्व शिक्षा अभियानांतर्गत १ ते ८ पर्यंत शिकणाऱ्या सर्व मुली, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व बीपीएलधारक पालकांची मुले असे एकूण जिल्हाभरातील ६५ हजार ५९८ विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात मोफत गणवेश दिले जाणार आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार १ ते ८ पर्यंत शिक्षण घेणे हा प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार बनला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबरोबरच शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार, गणवेश, पुस्तके मोफत उपलब्ध करून दिले जातात. शाळा व विद्यार्थ्यांना सोयीसुविधा यासाठी पुरविण्यासाठी सर्व शिक्षा अभियान हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत एक ते आठपर्यंत शिकणाऱ्या सर्व मुली अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व बीपीएलधारक पालकांच्या प्रत्येक पाल्याला दोन गणवेश मोफत दिले जातात. गणवेशासाठी पात्र असलेले गडचिरोली जिल्ह्यात एकूण ६५ हजार ५९८ विद्यार्थी आहेत. यामध्ये २८ हजार ७१८ विद्यार्थी व ३६ हजार ८८० विद्यार्थिनींचा समावेश आहे. अनुसूचित जातीच्या ३ हजार ५७४, अनुसूचित जमातीच्या १४ हजार ६६६, बीपीएलधारक १० हजार २२४ विद्यार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 65,000 students get uniforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.