दारूमुक्त निवडणुकीसाठी ६६ गावे एकवटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:33 AM2020-12-31T04:33:55+5:302020-12-31T04:33:55+5:30
लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा दारूमुक्त करण्याचा जिल्ह्यातील गावांचा मानस आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये तीनही विधानसभा मतदार संघातील ...
लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा दारूमुक्त करण्याचा जिल्ह्यातील गावांचा मानस आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये तीनही विधानसभा मतदार संघातील प्रमुख राजकीय व अपक्ष मिळून नऊ उमेदवारांनी मतदारांना दारूचे प्रलोभन देणार नाही आणि दारूचा वापर करणार नाही, असा वचननामा लिहून दिला होता. यापूर्वी लोकसभा निवडणुकीतही दारू वितरित करण्याचे प्रमाण कमी झाले होते. त्याचप्रकारे यंदाची ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा दारूमुक्त करण्यासाठी गावागावात ठराव घेऊन प्रयत्न केल्या जात आहे.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दारूचे वाटप होण्याची शक्यता असते. यावर नियंत्रण ठेवत दारूमुक्त निवडणूक करण्यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील ६६ गावांनी ठराव घेतला आहे. गावात दारूचा शिरकाव होऊ देणार नसल्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे. त्यामुळे योग्य उमेदवाराची निवड करून ग्राम विकासाला चालना मिळणार आहे.
बाॅक्स...
या गावांनी घेतला दारूमुक्तीचा ठराव
यात देसाईगंज तालुक्यातील डोंगर मेंढा, चिखली, डोंगरगाव हलबी, फरी, आरमोरीतील देवीपूर कॅम्प, पाथरगोटा, शंकरनगर, देशपुर, कुरखेडातील नवरगाव, शिरपूर, खैरी, बेलगाव, वाढोणा, कोरची तालुक्यातील कमेली, बिहाटे खु, मोहगाव, घुगवा, पांढरापाणी, नवरगाव, बिहाटे, धानोरा तालुक्यातील हलकनार, काकडयेली, गोटाटोला, दराची, आंबेझरी, कर्रेमर्का, ढवरी, मकेपायली, रेखाटोला, गडचिरोलीतील आंबेटोला, टेंभा, बेलगाव, मौशी खांब, वसा चक २, वसा, मुरमाडी, चुरचुरा माल, कुऱ्हाडी, गोविंदपूर. चामोर्शी तालुक्यातील गिलगाव, बांधोना, मोहुर्ली मोकासा, रामाळा, मुलचेरा तालुक्यातील तुमरगुंडा, मुकली, रेंगेवाही, लोहारा, कोठारी, कोपरअल्ली माल, गोविंदपूर, हरीनगर, हेटलकसा, एटापल्ली तालुक्यातील अलदांडी, पंदेलवाही, करेम, घोटेसुर, गुंडम, ताटीगुडम, येमली, कांदळी, सिरोंचातील मंडलपूर, रामकृष्णपूर, मद्दीकुंठा, आड्डीपूर, जानमपल्ली आदी गावांनी दारूमुक्त निवडणूक करण्याचा ठराव घेतला आहे.
फाेटाे... दारूमुक्त निवडणुकीचा निर्धार करताना ग्रामस्थ.