आष्टीत ६९ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:33 AM2021-01-22T04:33:10+5:302021-01-22T04:33:10+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क आष्टी : चामाेर्शी तालुक्यातील सर्वात माेठी ग्रामपंचायत असलेल्या आष्टी येथे ४२ उमेदवार रिंगणात हाेते. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : चामाेर्शी तालुक्यातील सर्वात माेठी ग्रामपंचायत असलेल्या आष्टी येथे ४२ उमेदवार रिंगणात हाेते. एकूण ५ हजार ४३० मतदारांपैकी ३ हजार ६२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये १ हजार ८५८ पुरुष व १ हजार ७६८ महिलांचा समावेेश आहे.
प्रभाग क्र. १ मध्ये एकूण १ हजार ३४० मतदार आहेत. त्यापैकी ७८४ मतदारांनी मतदान केले. प्रभाग क्र. २ मध्ये ९१६ पैकी ७५३, प्रभाग क्र. ३ मध्ये ७९५ पैकी ५४४, प्रभाग क्र. ४ मध्ये १ हजार ३९९ पैकी ९०७ तर प्रभाग क्र. ५ मध्ये ९०० मतदारांपैकी ६३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आष्टी ग्रामपंचायतीत एकूण १५ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी ४२ उमेदवार रिंगणात हाेते. प्रभारी पाेलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनात आष्टी येथील प्रत्येक मतदान केंद्रावर चाेख पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. त्यामुळे मतदानादरम्यान काेणतीही अनुचित घटना घडली नाही.
बहुतांश प्रभागांमधील लढती अत्यंत चुरशीच्या झाल्या आहेत. मतदान पार पडल्यानंतर एकूण मतदारांपैकी आपल्याला किती मते मिळाली, यावरून जयपराजयाचा अंदाज बांधला जात आहे. गुरुवारी दिवसभर पानठेल्यांवर निवडणुकीविषयी चर्चा रंगल्या हाेत्या. शुक्रवारी चामाेर्शी येथे मतमाेजणी हाेणार आहे. माेतमाेजणीची उत्कंठा शिगेला पाेहाेचली आहे. आष्टी येथून शेकडाे नागरिक व कार्यकर्ते चामाेर्शी येथे जाणार आहेत.