७९ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 12:26 AM2018-05-03T00:26:53+5:302018-05-03T00:26:53+5:30

महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवैध खनन व वाहतुकीसंबंधात रेती घाटावर तसेच मुरूमाच्या खाणीच्या परिसरात धाडसत्र राबवून सन २०१७-१८ या वर्षभरात एकूण ६६६ प्रकरणे निकाली काढले आहेत.

7 lakh fine recovered | ७९ लाखांचा दंड वसूल

७९ लाखांचा दंड वसूल

Next
ठळक मुद्देवर्षभरातील कारवाई : अवैध खनन व वाहतुकीची ६६६ प्रकरणे निकाली

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवैध खनन व वाहतुकीसंबंधात रेती घाटावर तसेच मुरूमाच्या खाणीच्या परिसरात धाडसत्र राबवून सन २०१७-१८ या वर्षभरात एकूण ६६६ प्रकरणे निकाली काढले आहेत. या प्रकरणातून संबंधीत तस्करांकडून एकूण ७९ लाख ११ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.
जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने दरवर्षी रेती घाटाची लिलाव प्रक्रिया राबविले जाते. या लिलाव प्रक्रियेतून प्रशासनामार्फत शासनाला कोट्यवधीचा महसूल प्राप्त होत असतो. मात्र सदर लिलाव प्रक्रियेत सहभागी न होताही काही तस्कर रेतीची अवैधरित्या वाहतूक करतात. तसेच काही कंत्राटदार क्षमतेपेक्षा व टीपीपेक्षा अधिक रेतीचे खनन करतात. अशा कंत्राटदाराविरोधात धडक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात प्रत्येक तालुकास्तरावर पथक गठीत करण्यात आले आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी हे विविध भागातील रेती घाटावर धाडसत्र राबवून संबंधित कंत्राटदाराकडून दंड वसूल करतात.
गडचिरोली उपविभागात समाविष्ट असलेल्या गडचिरोली तालुक्यात अवैध खनन व वाहतुकीचे एकूण ११० प्रकरणे निकाली काढण्यात आले. याप्रकरणातून वर्षभरात १७ लाख २४ हजार ९६० रूपयांचा दंड महसूल अधिकाऱ्यांनी वसूल केला आहे. धानोरा तालुक्यात १३ प्रकरणे निकाली काढून १ लाख २० हजार १६० रूपयांचा दंड कंत्राटदाराकडून वसूल करण्यात आला आहे. गडचिरोली उपविभागात एकूण १२३ प्रकरणांच्या माध्यमातून ११ लाख ४५ हजार १२० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. चामोर्शी उपविभागात मुलचेरा व चामोर्शी या दोन तालुक्याचा समावेश आहे. चामोर्शी तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांनी ११२ प्रकरणे निकाली काढून १ लाख ५८ हजार ६८० रूपयांचा दंड वसूल केला आहे. मुलचेरा तालुक्यातील अधिकाऱ्यांनी ३९ प्रकरणातून २ लाख ६१ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. चामोर्शी उपविभागात एकूण १५१ प्रकरणातून १८ लाख ४१ हजार ६८० रूपयांचा दंड वर्षभरात वसूल केला आहे. देसाईगंज उपविभागात आरमोरी व देसाईगंज तालुक्याचा समावेश असून या उपविभागात एकूण १८१ प्रकरणातून १९ लाख ५६ हजार २०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कुरखेडा उपविभागात कोरची व कुरखेडा तालुक्याचा समावेश असून या उपविभागात ११० प्रकरणातून ६ लाख ८८ हजार ९०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.
देसाईगंज उपविभाग आघाडीवर
सन २०१७-१८ या वर्षात देसाईगंज उपविभागाने जिल्ह्यात सर्वाधिक १८१ प्रकरणे निकाली काढून १९ लाख ५६ हजार २०० दंड महसूल अधिकाऱ्यांनी वसूल केला आहे. त्याखालोखाल चामोर्शी उपविभागाने १५१ प्रकरणे निकाली काढून १८ लाख ४१ हजार ६८० रूपयांचा दंड वसूल केला आहे. त्यानंतर गडचिरोली उपविभागाने अवैध खनन व वाहतुकीच्या बाबत चांगली कारवाई केली आहे. सन २०१७-१८ या वर्षात अवैध खनन व वाहतुकीबाबतच्या कारवाईत एटापल्ली उपविभाग पिछाडीवर आहे. या उपविभागाने वर्षभरात केवळ २४ प्रकरणे निकाली काढून ३ लाख ४६ हजार ७०० इतका दंड संबंधित कंत्राटदाराकडून वसूल केला आहे. अहेरी उपविभागाने ७७ प्रकरणे निकाली काढून १२ लाख ३३ हजार २०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.

Web Title: 7 lakh fine recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू