मुरूमगावच्या महाराजस्व मेळाव्यात ७०० अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 01:40 AM2019-01-09T01:40:30+5:302019-01-09T01:41:34+5:30
मुरूमगाव येथे ८ जानेवारी रोजी शासकीय पोस्ट बेसीक आश्रमशाळेत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस मदत केंद्र मुरूमगावच्या मदतीने महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात विविध योजनांचे ७०० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरूमगाव : मुरूमगाव येथे ८ जानेवारी रोजी शासकीय पोस्ट बेसीक आश्रमशाळेत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस मदत केंद्र मुरूमगावच्या मदतीने महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात विविध योजनांचे ७०० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले.
मेळाव्याचे उद्घाटन पंचायत समिती सभापती अजमन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड होते. प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार डी. एम. वाकुडकर, जि.प. सदस्य लता पुंगाटी, मुरूमगावचे सरपंच प्रियंका कुंजाम, हरीभाऊ धुर्वे, प्रभारी पोलीस अधिकारी राजू थोरात, पोलीस उपनिरिक्षक सचिन पागोटे, विनोद भालेराव, अतुल नवले, मुनिर शेख, मुख्याध्यापक आकुलवार, वड्डे आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात पोलीस विभागातील सर्व कर्मचारी, शिक्षण विभाग, राजस्व विभाग, आरटीओ, कृषी विभाग व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. युवतींनी रेला नृत्य सादर केले. परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणप, जन्म दाखला, वाहन परवाना, कृषी विभागाच्या योजना, वन विभागाच्या योजना आदी बाबतचे जवळपास ७०० अर्ज प्राप्त झाले. हे सर्व अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकाºयांनी दिले. आश्रमशाळेतील १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पोलीस मदत केंद्र मुरूमगावतर्फे कपड्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना एसडीपीओंनी शासकीय योजनांची माहिती कर्मचाºयांनी नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले. प्रास्ताविक प्रभारी पोलीस अधिकारी राजू थोरात यांनी केले.
पूल बांधण्याची मागणी
बोटनखेडा, कुलभट्टी, हिरंगे, पन्नेमारा, सिंदेसूर या मार्गांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावर दुरूस्ती करणे आवश्यक झाले आहे. मुरूमगाव परिसरातील अनेक गावे घनदाट जंगलात वसली आहेत. या गावांना जाताना लहान-मोठे नाले पडतात. मात्र या नाल्यांवर पूल नसल्याने पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटतो. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे पुलाचे बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.
मुख्यालयाबाबत तक्रार
जिल्हा परिषद सदस्य लता पुंगाटे यांनी मार्गदर्शन करताना ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक, शिक्षक हे मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार केली. मुख्यालयी राहून सेवा देण्याबाबत अनेक वेळा वरिष्ठ अधिकाºयांकडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. मात्र अजूनपर्यंत वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे कर्मचाºयांचे अपडाऊन सुरूच आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी केली.