काेराेना चाचण्यांवर दर दिवशी ७० हजारांचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:38 AM2021-04-02T04:38:51+5:302021-04-02T04:38:51+5:30
अँटिजन टेस्टचे परिणाम १५ ते २० मिनिटात उपलब्ध हाेतात. त्यामुळे आराेग्य विभागाचे कर्मचारी या चाचण्यांचा सर्वाधिक वापर ...
अँटिजन टेस्टचे परिणाम १५ ते २० मिनिटात उपलब्ध हाेतात. त्यामुळे आराेग्य विभागाचे कर्मचारी या चाचण्यांचा सर्वाधिक वापर करीत असल्याचे दिसून येते. अँटिजन टेस्टची एक किट जवळपास ६० रुपयांना उपलब्ध हाेते. यावर जवळपास प्रशासनाचे दर दिवसाला ७० हजार रुपये खर्च हाेतात. काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने काॅन्टॅक्ट ट्रेसिंगची संख्या वाढणार आहे. त्यामुळे काेराेना चाचण्यांची संख्या सुद्धा वाढणार आहे.
काही नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट केली जाते. आरटीपीसीआर टेस्टची जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र लॅब उपलब्ध आहे. आरटीपीसीआर टेस्ट अँटिजन टेस्टच्या तुलनेत विश्वसनीय मानली जाते. मात्र या टेस्टचा निकाल येण्यास उशीर लागतो.
बाॅक्स....
सरकारी रुग्णालयांवरच भार
खासगी रुग्णालयानांही काेराेना टेस्ट करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. मात्र गडचिराेली जिल्ह्यातील एकाही खासगी रुग्णालयात काेराेना टेस्ट करण्याची सुविधा नाही. त्यामुळे काेराेना टेस्टचा सर्वच भार सरकारी यंत्रणेला सहन करावा लागत आहे.
बाॅक्स...
जिल्ह्यात दरराेज केल्या जाणाऱ्या चाचण्या
अँटिजन - १३००
आरटीपीसीआर - २५०
बाॅक्स...
राेजच्या चाचण्यांची संख्या - १५५०
प्रयाेगशाळांची संख्या - १
बाॅक्स...
मागील आठवड्यात झालेल्या चाचण्या - ११४५१