आरटीईच्या ६२४ जागांसाठी ७०९ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:33 AM2021-04-03T04:33:09+5:302021-04-03T04:33:09+5:30
आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यासाठी शाळांना नाेंदणी करावी लागते. जिल्ह्यातील ७६ शाळांनी नाेंदणी केली असून या शाळांमध्ये ६२४ जागा आरक्षित ...
आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यासाठी शाळांना नाेंदणी करावी लागते. जिल्ह्यातील ७६ शाळांनी नाेंदणी केली असून या शाळांमध्ये ६२४ जागा आरक्षित आहेत. या जागांसाठी केवळ ७०९ अर्ज प्राप्त झाले आहेत. जागांच्या तुलनेत अर्जांची संख्या फारशी जास्त नाही. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.
बाॅक्स ...
नामांकित शाळांसाठी सर्वाधिक स्पर्धा
शहरातील काही शाळा नामांकित मानल्या जातात. या शाळांमध्ये प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा प्रत्येक पालकाची राहते. मात्र या शाळांसाठी अर्ज करणाऱ्या पालकांची संख्यासुद्धा सर्वाधिक राहते. त्यामुळे या शाळेमध्ये प्रवेश मिळेलच, याची खात्री देता येत नाही. पूर्वीच्या तुलनेत अर्ज करणाऱ्यांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली आहे.
काेट ......
आरटीई अंतर्गत अर्ज करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे अर्ज केला तरी अपेक्षित शाळेत प्रवेश मिळेलच याची शाश्वती राहिली नाही. आरटीई ही गरीब पालकांसाठी चांगली याेजना आहे. - प्रवीण देशमुख, पालक
काेट .....
सर्वच इंग्रजी माध्यमाच्या शाळांना आरटीई अंतर्गत जागा आरक्षित ठेवणे आवश्यक आहे. मात्र काही शाळा कायद्यातील त्रुटींचा आधार घेत आरटीई अंतर्गत प्रवेश देत नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. - वासुदेव ढाेमणे, पालक
बाॅक्स ...
आता लक्ष लाॅटरीकडे
आरक्षित जागांच्या तुलनेत अर्जांची संख्या अधिक असल्यास लाॅटरी काढली जाते. लाॅटरीवरच विद्यार्थ्याचा प्रवेश अवलंबून राहते. ही सर्व प्रक्रिया पुणे येथून नियंत्रित केली जाते. ज्या पाल्याचा प्रवेश निश्चित झाला त्याच्या पालकाला संदेश पाठविला जाते. त्यामुळे आता पालकांचे लक्ष आता लाॅटरीकडे लागले आहे. लाॅटरी काेणत्या दिवशी काढली जाईल, हे अजूनपर्यंत निश्चित झाले नाही.
काेट ....
आरटीई अंतर्गत जास्तीत जास्त पालकांनी अर्ज करावा यासाठी शिक्षण विभागामार्फत प्रसिद्धी करण्यात आली. ६२४ जागांसाठी ७०९ अर्ज प्राप्त झाले आहेत. जागांच्या तुलनेत दुप्पट अर्ज प्राप्त हाेतील, अशी अपेक्षा हाेती. मात्र तेवढे अर्ज प्राप्त झाले नाही. - मधुकर दाेनाडकर, जिल्हा समन्वयक, पर्यायी शिक्षण.
बाॅक्स ....
नाेंदणी केलेल्या शाळा - ७६
एकूण जागा - ६२४
एकूण अर्ज - ७०९