पोटनिवडणुकीसाठी ७२.७७ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:12 AM2018-05-28T01:12:22+5:302018-05-28T01:12:22+5:30
जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतीमधील सात सदस्य व एका सरपंच पदासाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत ७२.७७ टक्के सरासरी मतदान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतीमधील सात सदस्य व एका सरपंच पदासाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत ७२.७७ टक्के सरासरी मतदान झाले आहे.
आरमोरी तालुक्यातील सिर्सी येथे दोन जागेसाठी मतदान घेण्यात आले. या दोन जागांसाठी एकूण १ हजार ५३४ मतदार होते. त्यापैकी १ हजार ४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी ६७.९९ टक्के एवढी आहे. गडचिरोली तालुक्यातील विहिरगाव येथे एका ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागेसाठी निवडणूक झाली. एकूण ४६१ मतदारांपैकी ३७३ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ८०.९१ टक्के एवढी आहे. चामोर्शी तालुक्यातील घोट येथील एक व चंदनखेडी येथील एका जागेसाठी मतदान झाले. घोट येथे एकूण ७१९ मतदारांपैकी ४७८ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६६.४८ टक्के एवढी आहे. चंदनखेडी येथील एकूण २६७ मतदारांपैकी २५१ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ९४.०१ टक्के आहे. सिरोंचा तालुक्यातील कोर्ला माल येथे सरपंच व ग्रा.पं. सदस्य पदासाठी निवडणूक झाली. कोटापल्ली येथे सदस्य पदासाठी निवडणूक झाली. या दोन्ही जागेसाठी एकूण १ हजार १७२ मतदार होते. त्यापैकी ८ हजार ७७ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ७४.८३ टक्के एवढी आहे. सहाही ग्रामपंचायतीत एकूण ४ हजार १५३ मतदारांपैकी ३ हजार २२ मतदारांनी मतदान केले. आज मतमोजणी केली जाणार आहे.