७५ घरांचा स्वयंपाक धूरमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:08 PM2018-07-23T22:08:26+5:302018-07-23T22:08:51+5:30
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत देसाईगंज तालुक्याच्या किन्हाळा व मोहटोला येथील एकूण ७५ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. त्यामुळे या ७५ घरांचा स्वयंपाक धूरविरहीत झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहटोला/किन्हाळा : प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत देसाईगंज तालुक्याच्या किन्हाळा व मोहटोला येथील एकूण ७५ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. त्यामुळे या ७५ घरांचा स्वयंपाक धूरविरहीत झाला आहे.
गॅस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कैलास पारधी होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच ऋषी दोनाडकर, ग्रामसेवक ए.पी.राठोड, गॅस वितरण एजन्सीचे गोवर्धन डोंगरे, रामचंद्र पिलारे, वैभव दोनाडकर, नेताजी मेश्राम आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोहटोला व किन्हाळा या दोन्ही गावातील एकूण ७५ महिला लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर, शेगडी, रेग्युलेटर व इतर साहित्य प्रदान करण्यात आले.
सदर योजनेचा लाभ मिळाल्यामुळे जंगलावरील भार कमी होणार आहे. शिवाय महिलांचे आरोग्यही चांगले राहणार आहे. योजनेचा लाभ मिळालेल्या महिलांनी गॅसचा नियमित व योग्य वापर करावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी यावेळी केले. यावेळी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.