नगर पंचायतींसाठी ७७ टक्के मतदान

By Admin | Published: November 2, 2015 01:06 AM2015-11-02T01:06:04+5:302015-11-02T01:06:04+5:30

सहा नगर पंचायतीसाठी पहिल्या टप्प्यात रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. या सहाही नगर पंचायतीत सरासरी ७७.०५ टक्के एवढे मतदान झाले आहे.

77 percent voting for Nagar Panchayats | नगर पंचायतींसाठी ७७ टक्के मतदान

नगर पंचायतींसाठी ७७ टक्के मतदान

googlenewsNext

पहिला टप्पा : चामोर्शी ८१.१९, अहेरी ६८.५४, एटापल्ली ७७, सिरोंचा ७८.३६, भामरागड ७१.४२, मुलचेरा ८५.५२
गडचिरोली : सहा नगर पंचायतीसाठी पहिल्या टप्प्यात रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. या सहाही नगर पंचायतीत सरासरी ७७.०५ टक्के एवढे मतदान झाले आहे.
नगर पंचायतीची पहिलीच निवडणूक असल्याने मतदार व उमेदवारांमध्ये निवडणुकीविषयी प्रचंड उत्सुकता होती. विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केल्याने निवडणुकीतील रंगत आणखी वाढली होती.
सहा नगर पंचायतीपैकी चामोर्शी नगर पंचायतीमध्ये ८१.१९ टक्के, भामरागड ७१.४२ टक्के, भामरागड ७१.४२ टक्के, सिरोंचा ७८.३६ टक्के, एटापल्ली ७७ टक्के, मुलचेरा ८५.५२ टक्के व अहेरी नगर पंचायतीत ६८.५४ टक्के एवढे मतदान झाले आहे. सहाही नगर पंचायतीत सरासरीने ७७.०५ एवढे मतदान झाले आहे.
नगर पंचायती निवडणुका शहरी भागातच होणार असल्याने मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती. त्यामुळे मतदारास मतदान करण्यास पुरेसा कालावधी मिळाला. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस विभागाच्या वतीने सहाही नगर पंचायतीच्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे शांतता भंग करणारी जिल्ह्यात एकही मोठी घटना घडली नाही. महसूल विभागानेही पर्याप्त कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याने मतदान केंद्रावर शांतता बघायला मिळाली.

Web Title: 77 percent voting for Nagar Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.