देवनगर जंगल परिसरात ८ ड्रम मोहसडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:25 AM2021-07-20T04:25:08+5:302021-07-20T04:25:08+5:30
प्रल्हाद हेमचरण सरकार (३५), रवीन नीलरतन मंडल (३०) दोन्ही रा. देवनगर अशी आरोपींची नावे आहेत. मुलचेरा तालुक्यातील देवनगर गावात ...
प्रल्हाद हेमचरण सरकार (३५), रवीन नीलरतन मंडल (३०) दोन्ही रा. देवनगर अशी आरोपींची नावे आहेत.
मुलचेरा तालुक्यातील देवनगर गावात व परिसरात अवैध दारूविक्रेते सक्रिय आहेत. येथील दारूविक्रेते मुलचेरा व चामोर्शी तालुक्यातील गावात विक्रीसाठी अवैध दारू पुरवठा करीत असतात. त्यामुळे परिसरातील गावकरी त्रस्त झाले आहेत. या गावातील दारूविक्रेत्यांनी जंगल परिसरात मोहसडवा व दारू भट्ट्या लावल्या असल्याची माहिती गाव संघटनेकडून प्राप्त झाली. प्राप्त माहितीच्या आधारे मुलचेरा पोलीस, मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेने संयुक्तरीत्या जंगल परिसरात शोधमोहीम राबविली. दरम्यान पोलिसांना पाहून दाेघांनी पळ काढला. घटनास्थळावर पाहणी केली असता ८ ड्रम मोहसडवा व दारू गाळण्याचे साहित्य आढळून आले. संपूर्ण माल घटनास्थळावर नष्ट करून आरोपींची ओळख पटवून गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पारडे, पोलीस पाटील आशा मुजुमदार, मुक्तिपथ तालुका संघटक रुपेश अंबादे यांनी केली.