८ लाख ६५ हजारांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 05:00 AM2020-06-21T05:00:00+5:302020-06-21T05:01:11+5:30

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बर्डी परिसरात पाळत ठेवली. दरम्यान एमएच ३१ सीआर ०३२२ क्रमांकाचे चारचाकी वाहन क्रमांकाची चारचाकी वाहन दारूची तस्करी होत होती. पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग केल्यानंतर राहूल टेंभुर्णे याच्या घरासमोर हे वाहन थांबले. दरम्यान वाहनातील चारही दारू तस्कर पळून गेले. पोलिसांनी या वाहनातून ३ लाख १२ हजार रुपये किमतीच्या ९० मिली मापाच्या देशी दारूच्या ३९ पेट्या जप्त केल्या.

8 lakh 65 thousand liquor stocks confiscated | ८ लाख ६५ हजारांचा दारूसाठा जप्त

८ लाख ६५ हजारांचा दारूसाठा जप्त

Next
ठळक मुद्देदोन चारचाकी वाहन पकडले । स्थानिक गुन्हे शाखा व आरमोरी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व आरमोरी पोलीस ठाण्याच्या पथकाने १९ व २० जून रोजी वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून तब्बल ८ लाख ६५ हजार रुपयांचा देशी, विदेशी व मोहफूल दारूचा साठा जप्त केला. विशेष म्हणजे, दोन चारचाकी वाहनातून दारूची तस्करी होत असताना वाहन अडवून दारूसाठा जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बर्डी परिसरात पाळत ठेवली. दरम्यान एमएच ३१ सीआर ०३२२ क्रमांकाचे चारचाकी वाहन क्रमांकाची चारचाकी वाहन दारूची तस्करी होत होती. पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग केल्यानंतर राहूल टेंभुर्णे याच्या घरासमोर हे वाहन थांबले. दरम्यान वाहनातील चारही दारू तस्कर पळून गेले. पोलिसांनी या वाहनातून ३ लाख १२ हजार रुपये किमतीच्या ९० मिली मापाच्या देशी दारूच्या ३९ पेट्या जप्त केल्या. तसेच ९० मिली मापाच्या ११ पेट्या जप्त केल्या आहे. या दारूची किंमत ८८ हजार रुपये आहे. दारू व चारचाकी वाहन मिळून एकूण ९ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. या प्रकरणातील आरोपी तुफानसिंग राजूसिंग पटवा रा. देसाईगंज, राहूल कैलास टेंभुर्णे, प्रविण भाऊराव खोब्रागडे व गुड्डू रेकचंद ठवरे तिघेही रा. आरमोरी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर चारही आरोपी फरार आहेत.
दुसऱ्या कारवाईत आरमोरी पोलिसांनी वैरागड मार्गावर पाटणवाडा गावाजवळ ४ लाख ५५ हजार रुपये किमतीची ६५ पेट्या देशी दारू जप्त केली. एमएच २९ बीसी ४३९८ क्रमांकाचे चारचाकी वाहन, ३९ हजार रुपयाचे चार मोबाईल असा एकूण १२ लाख ४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी विशाल घनश्याम देशमुख, सोनू वामन पुलेवार दोघेही रा. गडचिरोली यांना अटक केली. व्यंकटेश नारायण गहेरवार रा. गडचिरोली हा फरार आहे. दुसºया एका कारवाईत आरमोरी पोलिसांनी १० हजार रुपयांची दारू जप्त केली.

Web Title: 8 lakh 65 thousand liquor stocks confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.