गडचिरोली जिल्ह्यात सिकलसेलचे ८ विद्यार्थी आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 01:28 PM2019-11-13T13:28:05+5:302019-11-13T13:28:40+5:30
ग्रामीण रुग्णालय धानोरा व आरोग्यधाम संस्था यांनी संयुक्तरित्या बुधवारी दि. १३ रोजी केलेल्या तपासणीत ८ विद्यार्थ्यांना सिकलसेलचा आजार झाल्याचे निदर्शनास आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: ग्रामीण रुग्णालय धानोरा व आरोग्यधाम संस्था यांनी संयुक्तरित्या बुधवारी दि. १३ रोजी केलेल्या तपासणीत ८ विद्यार्थ्यांना सिकलसेलचा आजार झाल्याचे निदर्शनास आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहली येथे विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी केली एकूण ५३ विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी केली. या तपासणीत ८ विद्यार्थी संशयित आढळले. त्यांचे रक्त नमुने पुढील तपासणी करीता घेण्यात आले. विद्यार्थ्यांना सिकलसेल आजारावर माहिती दिली. ग्रामीण रुग्णायल येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र सावसाकडे यांच्या मार्गदर्शनात धानोरा तालुका येथे फिरते वैद्यकीय पथक यांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक शाळा, अंगणवाडी व गावा गावात जाऊन आरोग्य शिबीर आयोजित करून विद्यार्थ्यांना व नागरिकांना आरोग्यसेवा देण्यात येते. सदर तपासनीस ग्रामीण रुग्णायल धानोरा येथील कर्मचारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ डेव्हिड गुरुनुले, सिकलसेल पर्यवेक्षक गणेश कुळमेथे, डिकेश मेश्राम, रवी वैरागडे, रीना कुडयामी यांनी केली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी. बी. चांदेकर, हारामी सर, धावडे सर, धुडसे मॅडम यांनी सहकार्य केले.