देसाईगंज तालुक्यात कोरोनाचे ८१ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:45 AM2021-06-09T04:45:33+5:302021-06-09T04:45:33+5:30

देसाईगंज तालुक्यात मागील मे महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख वाढतच गेला. आतापर्यंत एकूण २,६५४ पॉझिटिव्ह रुग्ण झाले. त्यापैकी २,५३७ बरे ...

81 victims of corona in Desaiganj taluka | देसाईगंज तालुक्यात कोरोनाचे ८१ बळी

देसाईगंज तालुक्यात कोरोनाचे ८१ बळी

Next

देसाईगंज तालुक्यात मागील मे महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख वाढतच गेला. आतापर्यंत एकूण २,६५४ पॉझिटिव्ह रुग्ण झाले. त्यापैकी २,५३७ बरे झाले, तर ८१ जण मृत्यूमुखी पडले. दिनांक ७ पासून गडचिरोली जिल्हा प्रशासनाने तिसऱ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचनांनुसार व स्थानिक परिस्थितीवरून आस्थापनांना ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली. यादरम्यान नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक केले आहे.

देसाईगंज शहर परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असून, सर्वच प्रकारची आस्थापने होलसेल स्वरुपाची आहेत. या ठिकाणी मोठी वर्दळ निर्माण होऊन खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आस्थापनाधारक व ग्राहक यांनी कोरोनाच्या नियमांच्या अधीन राहून व्यवसाय करावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा डॉ. जयस्वाल यांनी दिला आहे.

स्वैराचारपणे वागल्यास कोरोना वाढेल व पर्यायाने मृत्यूचा आलेखही वाढण्याची शक्यता आहे. त्यात भर पडणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: 81 victims of corona in Desaiganj taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.