८१ हजारांचा गूळ व सुगंधित तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:18 AM2020-12-28T04:18:58+5:302020-12-28T04:18:58+5:30
अहेरी : स्थानिक पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या कारवाई करीत इंदाराम येथील दोन किराणा दुकानांतून ७४ पेट्या गूळ ...
अहेरी : स्थानिक पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या कारवाई करीत इंदाराम येथील दोन किराणा दुकानांतून ७४ पेट्या गूळ व ४४ सुगंधित तंबाखूचे डब्बे. असा एकूण ८१ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन्ही दुकानदारांवर अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
साईनाथ सदाशिव बिरेलीवार (४७), सौरभ व्यंकटेश नरेंद्रलवार (३५) दोन्ही रा. इंदाराम अशी आरोपींचे नावे आहेत. इंदाराम येथे अवैधरित्या क्षमतेपेक्षा अधिक गूळ व सुगंधित तंबाखूची विक्री केली जात असल्याची माहिती अहेरी पोलीस व मुक्तिपथ तालुका चमुला मिळाली. यानुसार इंदाराम येथील दोन्ही किराणा दुकानांची झडती घेतली. यावेळी दोन्ही दुकानांतून मोठ्या प्रमाणात गूळ, सुगंधित तंबाखू व इतर तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. साईनाथ बिरेलीवार या व्यवसायिकाच्या दुकानातून मज्जाचे ३१ डब्बे, ४४ गुळाच्या पेट्या, ५ गुडाखूचे बॉक्स तर सौरभ नरेंद्रलवार याच्या दुकानातून ३० गुळाच्या पेट्या, १३ मज्जा डब्बे, २० किलो तंबाखू आढळून आला. असा एकूण ८१ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत दोन्ही किराणा व्यवसायिकांवर अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे, पोलीस कॉन्स्टेबल देविदास मानकर , पोलीस कर्मचारी दीपक कत्रोजवार, मुक्तिपथचे तालुका संघटक केशव चव्हाण, तालुका प्रेरक मारोती कोल्हावार यांनी केली.
बाॅक्स .....
धाबा चालकाकडून २१ हजारांचा मुद्देमाल जप्त
मुलचेरा लुक्यातील कोपरअल्ली चेक गावानजीक धाबा सुरु करून अवैध दारूविक्री करणाऱ्यास गाव संघटनेच्या महिलांनी चांगलाच धडा शिकविला आहे. महिलांच्या पुढाकारातून पोलिसांनी दारूसह २१ हजारांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला. निर्मल निरोध सरदार असे आरोपीचे नाव आहे. कोपरअल्ली-आष्टी मार्गावर नव्याने सुरु झालेल्या लक्ष्मी फॅमिली रेस्टाॅरंटच्या नावावर अवैध दारूविक्री सुरु होती. त्यानुसार झडती घेऊन ४० लिटर मोहफुलाची दारू, विदेशी दारूच्या १० निपा तसेच त्याच्या शेतातून दोन ड्रम मोहसडवा व साहित्य. असा एकूण २१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बिट अंमलदार किरंगे व त्यांच्या सहकार्यांनी केली. यावेळी मुक्तिपथचे तालुका प्रेरक आनंद सिडाम व गाव संघटनेच्या महिला उपस्थित होत्या.