८२ हातपंप अपूर्ण

By Admin | Published: August 6, 2014 11:49 PM2014-08-06T23:49:44+5:302014-08-06T23:49:44+5:30

जिल्हा वार्षीक योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात २ कोटी रूपयांच्या निधीतून एकूण २३० हातपंपाचे काम मंजूर करण्यात आले. यापैकी १४८ हातपंपाचे खोदकाम जुलैअखेर पूर्ण झाले असून

82 handpumps are incomplete | ८२ हातपंप अपूर्ण

८२ हातपंप अपूर्ण

googlenewsNext

काम मंदावले : जिल्हा वार्षिक योजनेतील
गडचिरोली : जिल्हा वार्षीक योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात २ कोटी रूपयांच्या निधीतून एकूण २३० हातपंपाचे काम मंजूर करण्यात आले. यापैकी १४८ हातपंपाचे खोदकाम जुलैअखेर पूर्ण झाले असून पावसामुळे तसेच मजुरांच्या टंचाईमुळे तब्बल ८२ हातपंपाचे खोदकाम अद्यापही अपूर्णच असल्याची माहिती हाती आली आहे.
जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक ३ जुलै २०१४ रोजी पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जिल्हा वार्षीक योजनेतून विंधन विहिरीद्वारे पाणी पुरवठा व विंधन विहिरी जलनिर्मितीसाठी २ कोटी रूपयाची तरतूद करण्यात आल्याची माहिती संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. जिल्हा वार्षीक योजनेतून जिल्ह्यातील बाराही तालुक्यात २१० हातपंपाचे काम मंजूर करण्यात आले. तसेच अधिकचे १० हातपंपाचे काम मंजूर करण्यात आले. यात अहेरी तालुक्यात २४, आरमोरीत १३, भामरागड ६, चामोर्शी ६७, देसाईगंज ११, धानोरा ११, एटापल्ली १४, गडचिरोली २२, कोरची ६, कुरखेडा २१, मुलचेरा ११, सिरोंचा तालुकयात २४ हातपंपांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत जून महिन्यात हातपंप खोदण्याच्या कामाला सुरूवात झाली. या महिन्यात हातपंप खोदकाम युध्द पातळीवर झाले. मात्र जुलै महिन्यात संततधार पाऊस कोसळल्याने हातपंप खोदकाम मंदावले. जुलै अखेर १४८ हातपंपाचे काम पूर्ण करण्यात आले. यात अहेरी १७, आरमोरी १०, भामरागड ४, चामोर्शी ३९, देसाईगंज ७, धानोरा ५, एटापल्ली ११, गडचिरोली १०, कोरची ४, कुरखेडा ११, मुलचेरा ६ व सिरोंचा तालुक्यात २२ हातपंपांचा समावेश आहे. पावसाळ्याच्या दिवसात हातपंप खोदण्याची मशीन जमिनीत फसते. यामुळे जमिनीतील गाळ काढण्यासाठी अडचण निर्माण होते. अशा परिस्थितीत हातपंप खोदण्यासाठी मजुरही तयार होत नाही. अशा विविध कारणांमुळे सध्या जिल्हाभरातील हातपंप खोदकाम थांबविण्यात आले आहे. पावसाळ्यानंतर या कामाला सुरूवात होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 82 handpumps are incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.