दाेघांच्या मृत्यूसह ८३ नवीन कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 05:00 AM2020-11-07T05:00:00+5:302020-11-07T05:00:15+5:30

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६४ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.  शुक्रवारी झालेल्या मृत्यूमध्ये दोन्ही व्यक्ती ही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवाशी असून पहिली व्यक्ती ७८ वर्षीय पुरुष आहे. ताे व्यक्ती हायपरटेंशनने ग्रस्त होता. तसेच दुसरी व्यक्ती ५६ वर्षीय पुरुष आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.२३ टक्के आहे.

83 new coronaviruses infected with scabies | दाेघांच्या मृत्यूसह ८३ नवीन कोरोनाबाधित

दाेघांच्या मृत्यूसह ८३ नवीन कोरोनाबाधित

Next
ठळक मुद्दे११७ जण कोरोनामुक्त; मृत दाेघेही चंद्रपूर जिल्ह्यातील; मृतांचा आकडा झाला ६४

 लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दोन मृत्यूसह कोरोनाचे जिल्ह्यात ८३ नवीन बाधित आढळून आले. तसेच शुक्रवारी ११७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित ६ हजार ४०७ पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ५ हजार ४६१ वर पोहाेचली आहे. तसेच सद्या ८८२ क्रियाशील कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. 
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६४ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.  शुक्रवारी झालेल्या मृत्यूमध्ये दोन्ही व्यक्ती ही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवाशी असून पहिली व्यक्ती ७८ वर्षीय पुरुष आहे. ताे व्यक्ती हायपरटेंशनने ग्रस्त होता. तसेच दुसरी व्यक्ती ५६ वर्षीय पुरुष आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.२३ टक्के आहे.

अहेरी तालुक्यात आढळले १२ रूग्ण
अहेरी तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक ११, आलापल्ली १, आरमोरी तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक १, भामरागड तालुक्यातील बाधितांमध्ये डुडापल्ली १, चामोर्शी तालुक्यातील बाधितांतध्ये आंबेडकर वाॅर्ड १, पीएस आष्टी १, अनखोडा ३, वाघोली १, मातंग मोहल्ला १, पीएचसी आमगाव २, फराडा १, स्थानिक १, धानोरा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक २, एटापल्ली तालुक्यातील बाधितांमध्ये हालेवारा (पोलीस) १, स्थानिक १, कोरची  व कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक १, रामनगर १,  मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक २ यांचा समावेश आहे.

 नवीन ८३ बाधितांमध्ये गडचिरोली ४८, अहेरी १२, आरमोरी १, भामरागड १, चामोर्शी १०, धानोरा २, एटापल्ली २, कुरखेडा २, मुलचेरा १ व सिरोंचा  येथील ४ जणांचा समावेश आहे. 
कोरोनामुक्त झालेल्या ११७ रूग्णांमध्ये गडचिरोलीतील ४५, अहेरी १०, आरमोरी ७, भामरागड ९, चामोर्शी ७, एटापल्ली १४, मुलचेरा ११, सिरोंचा १, कोरची ६, कुरखेडा ४, वडसामधील ३  जणांचा समावेश आहे.

गडचिराेली तालुक्यातील रूग्ण

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील शिवाजी नगर कॅम्प एरिया १, साई नगर ३, सर्वोदय वाॅर्ड ४, गणेश नगर ५, वाॅर्ड नं.२ चंडेश्वरी मंदिराजवळ १,  नवेगाव कॉम्पलेक्स १,  कॅम्प एरिया २, बालाजी नगर चामोर्शी रोड १,  पोलीस कॉलनी १, स्थानिक २, बसेरा कॉलनी १, मुरखळा १, इंदिरानगर १, रामनगर ३, कोटगल १, महादवाडी १,  मेडिकल कॉलनी १, कनेरी १,  शांती निवास १, कॉम्प्लेक्स १, टी पाँईट चौक २, सूर्यडोंगरी पोटेगाव १, महिला महाविद्यालयाजवळ १, राखी गुरवळा १, चामोर्शी रोड ४, रेव्हेन्यु कॉलनी १, गोकुलनगर २, शिवाजी नगर १  यांचा समावेश आहे.

Web Title: 83 new coronaviruses infected with scabies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.