सहाचाकी वाहनात कोंबले ८३ विद्यार्थी

By admin | Published: September 26, 2016 01:32 AM2016-09-26T01:32:36+5:302016-09-26T01:32:36+5:30

शासकीय आश्रमशाळेच्या तब्बल ८३ विद्यार्थ्यांना सहाचाकी वाहनात कोंबून नेत असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

83 students of Kumbhal in the wheelchair | सहाचाकी वाहनात कोंबले ८३ विद्यार्थी

सहाचाकी वाहनात कोंबले ८३ विद्यार्थी

Next

सुरक्षा वाऱ्यावर : नागरिकांंनी वाहन रोखून दिली तंबी
कुरखेडा : शासकीय आश्रमशाळेच्या तब्बल ८३ विद्यार्थ्यांना सहाचाकी वाहनात कोंबून नेत असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
चामोर्शी तालुक्यातील दोन शासकीय आश्रमशाळेतील तब्बल ८३ विद्यार्थ्यांना एका सहाचाकी ट्रकमध्ये गुरा-ढोरासारखे कोंबून कोरची मार्गाकडे जात असल्याचे निदर्शनास येताच काही जागरूक नागरिकांनी या वाहनाला रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जांभुळखेडा गावाजवळ थांबविले. ट्रकचालक व सोबत असलेल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत जाब विचारत तंबी दिली. तसेच नियंत्रीत वेगात सुरक्षित वाहन चालविण्याची सूचना करून सदर वाहन सोडून दिले. सदर ट्रकमध्ये असलेले विद्यार्थी हे गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चामोर्शी तालुक्याच्या मार्र्कंडा व भाडभिडी येथील शासकीय आश्रमशाळेचे होत. या विद्यार्थ्यांना कोरची तालुक्याच्या कोटगुल येथे आयोजित प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेकरिता वाहनाने नेत असल्याचे तेथे उपस्थित शिक्षकांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून विद्यार्थ्यांची सुरक्षा धाब्यावर बसविली जात असल्याचे दिसून आले. असुरक्षित प्रवास करण्यात येत असल्याने नागरिकांनी उपस्थित शिक्षकांना जाब विचारत त्यांना धारेवर धरले. कोरची मार्गावर पुढे बेडगावजवळ मोठा घाट व वळणदार रस्ता असल्याने नियंत्रित वेगात सुरक्षित वाहन चालविण्याची सूचना वाहनचालकाला करून सदर वाहन नागरिकांनी सोडून दिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 83 students of Kumbhal in the wheelchair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.