मेटॅडोरमधून नेत असलेली ८५ पेट्या दारू जप्त

By admin | Published: September 25, 2016 01:40 AM2016-09-25T01:40:39+5:302016-09-25T01:40:39+5:30

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देसाईगंजचे पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक मानकर यांनी

85 Cereal Writings That Lead to Metadores | मेटॅडोरमधून नेत असलेली ८५ पेट्या दारू जप्त

मेटॅडोरमधून नेत असलेली ८५ पेट्या दारू जप्त

Next

देसाईगंज पोलिसांची कारवाई : सिनेस्टाईलने केला पाठलाग
देसाईगंज : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देसाईगंजचे पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक मानकर यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह देसाईगंज-आरमोरी मार्गावर सिनेस्टाईल पाठलाग करून कुरूड गावाजवळ मेटॅडोरसह १२ लाख ४० हजार रूपये किमतीची ८५ पेट्या देशी दारू शनिवारी पहाटेच्या सुमारास पकडली.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दारू विक्रेत्या आरोपीचे नाव श्रावण वासुदेव दोरीवार (२७) रा. मूल असे आहे. चारचाकी मेटॅडोर वाहनाने भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथून देसाईगंज, आरमोरीकडे मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असल्याची माहिती देसाईगंजचे पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांना मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरिक्षक मानकर व सहकारी पोलिसांनी देसाईगंज, आरमोरी मार्गावर कुरूड गावाजवळ पाळत ठेवली. दरम्यान एमएच ३१-६६९५ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची मेटॅडोर येताना दिसली. सदर वाहन थांबविण्यासाठी चालकाला हात देऊन इशारा केला. मात्र चालकाने वाहन थांबविला नाही. त्यानंतर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून सदर मेटॅडोरला अडविले. मेटॅडोरमधील आरोपी श्रावण वासुदेव दोरीवार याला मार्गावर येण्याचे कारण विचारण्यात आले. त्यानंतर मेटॅडोरची तपासणी केली असता, सदर मेटॅडोर पूर्णत: रिकामे असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा मेटॅडोर ट्रालीची कसून तपासणी केली. यावेळी मेटॅडोर ट्रालीच्या आत कप्पे असल्याचे निदर्शनास आले. या कप्प्याची तपासणी केल्यावर त्यात देशी दारूच्या ९० एमएल मापाच्या ८५ पेट्या आढळून आल्या. आरोपी श्रावण दोरीवार याच्या विरोधात देसाईगंज पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: 85 Cereal Writings That Lead to Metadores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.