८५ लाखांची वीज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:22 PM2018-01-12T23:22:38+5:302018-01-12T23:22:49+5:30

गडचिरोली मंडळात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत सुमारे ८५ लाख १९ हजार रूपयांची वीज चोरी उघडकीस आली आहे. ६५४ वीज चोरांवर महावितरणने कारवाई केली आहे.

85 lakhs of electricity theft | ८५ लाखांची वीज चोरी

८५ लाखांची वीज चोरी

Next
ठळक मुद्दे९ महिन्यांतील स्थिती : ६५४ वीज चोरांवर केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली मंडळात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत सुमारे ८५ लाख १९ हजार रूपयांची वीज चोरी उघडकीस आली आहे. ६५४ वीज चोरांवर महावितरणने कारवाई केली आहे.
वीज चोरीला आळा घालण्यासाठी वीज विभागातर्फे नवनवीन तंत्रज्ञान आणले जात आहे. मात्र काही वीज चोर त्याहूनही पुढे असून महावितरणच्या डोळ्यात धूळ झोकत वीज चोरी करीत आहेत. जेवढी वीज निर्मिती होते. त्यापैकी काही प्रमाणात विजेची गळती झाली तरी प्रमाणाच्या अधिक गळती होऊ नये, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महावितरणची आहे. त्यामुळे महावितरणचे कर्मचारी वीज चोरीवर नेहमी लक्ष ठेवून राहतात. वीज चोरीला आळा घालण्यासाठी डिजिटल मीटर बसविले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक मीटर घराच्या बाहेर काढण्यात आला आहे. तरीही वीज चोरीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यास वीज विभागाला यश प्राप्त झाले नाही.
गडचिरोली वीज मंडळात आलापल्ली, ब्रम्हपुरी व गडचिरोली या तीन विभागांचा समावेश होतो. वीज विभागाच्या कर्मचाºयांनी या तिन्ही विभागातील ६५४ नागरिकांच्या घरातील वीजचोरी पकडली आहे. या वीज चोरांनी ८५ लाख १९ हजार रूपयांची वीज चोरी केली आहे. ब्रम्हपुरी विभागात ३३५, गडचिरोली विभागातील १७६ तर आलापल्ली विभागातील १४२ वीज चोरींचे प्रकरणे उघडकीस आले आहेत.
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी प्रमाण
गडचिरोली जिल्ह्यात वीज चोरीचे प्रमाण गोंदिया, चंद्रपूर आदी जिल्ह्यांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. इतर जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या सुमारास तारांवर आकडे टाकून सर्रास वीज चोरी केली जाते. जवळपासचे सर्वच नागरिक वीज चोरी करीत असल्याने याबाबतची तक्रार नागरिक करीत नाही. परिणामी वीज चोरी उघडकीस येत नाही. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज चोरीचे प्रमाण कमी आहे.
दुर्गम भागात काही प्रमाणात वीज चोरी होत असली तरी त्यांच्याकडे विद्युत उपकरणे कमी राहत असल्याने वीज चोरीचे प्रमाण कमी होते.
वीज विभागातर्फे धडक मोहीम
वीज चोºया पकडण्यासाठी वीज विभागामार्फत जिल्हाभरात अधूमधून धडक मोहीम राबविली जाते. या मोहिमेदरम्यान वीज चोरी आढळून येते. पहिलेच वसुलीचे प्रमाण कमी असल्याने त्यातही वीज चोरी वाढते. दरवर्षी होणारी वीज चोरी लक्षात घेऊन या वीज चोरीवर आळा घालण्यासाठी महावितरणतर्फे जास्त प्रमाणात धडक मोहिम राबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे यावर्षी जास्त कारवाया झाल्या.

Web Title: 85 lakhs of electricity theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.