८६ हजारांची विदेशी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:32 AM2018-02-23T00:32:24+5:302018-02-23T00:32:44+5:30

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोलीचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र जगदाडे यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह खरपुंडी नाक्याजवळ चारचाकी वाहनाला अडवून या वाहनातून ८६ हजार ४०० रूपयांची विदेशी दारू गुरूवारी जप्त केली.

86 thousand foreign liquor seized | ८६ हजारांची विदेशी दारू जप्त

८६ हजारांची विदेशी दारू जप्त

Next
ठळक मुद्देदीड लाखांचे चारचाकी वाहन पकडले : एसडीपीओंच्या पथकाची कारवाई

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोलीचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र जगदाडे यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह खरपुंडी नाक्याजवळ चारचाकी वाहनाला अडवून या वाहनातून ८६ हजार ४०० रूपयांची विदेशी दारू गुरूवारी जप्त केली.
याप्रकरणी दारूविक्रेता प्रशांत ऊर्फ पिंटू मंडल (३२) रा. रामनगर, गडचिरोली याला अटक करून त्याचेवर मुंबई दारूबंदी कायद्याचे कलम ६५ (अ) व ९८ (क) अन्वये गडचिरोेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक जगदाडे यांना अशी माहिती मिळाली की, प्रशांत ऊर्फ पिंटू मंडल हा एमएच-३१-सीएम-४९४३ क्रमांकाच्या वाहनाने विदेशी दारूची वाहतूक आरमोरीकडून गडचिरोलीकडे करीत असल्याची माहिती मिळाली. सदर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांना पोलीस उपनिरीक्षक जगदाडे यांनी दिली. त्यानंतर जगदाडे यांनी आपले सहकारी पोेलीस हवालदार नरूले, नाईक पोलीस शिपाई कोहपरे यांना घेऊन आरमोरी मार्गावर पाळत ठेवली. दरम्यान आरमोरीवरून एमएच-३१-सीएम-४९४३ क्रमांकाचे वाहन येताना दिसले. या वाहनाला खरपुंडी नाक्यावर थांबवून वाहनचालकाचे नाव विचारले असता, प्रशांत ऊर्फ पिंटू मंडल असे त्यांनी सांगितले. वाहनातून विदेशी कंपनीच्या १८० मिली मापाच्या २८८ निपा आढळून आल्या. या दारूची किंमत ८६ हजार ४०० रूपये आहे. तर वाहनाची किंमत १ लाख ५५ हजार रूपये आहे.
सदर दारू व वाहनाचा पोलिसांनी पंचनामा केला. वाहनाच्या मागील सिटवर नायलॉयनच्या पिशव्यांमध्ये इंपेरियल ब्ल्यू कंपनीच्या दारूच्या बाटला आढळून आल्या. पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले असून दारू जप्त केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक जगदाडे करीत आहेत. यापूर्वीही गडचिरोली येथील एसडीपीओंच्या पथकाने चारचाकी वाहनासह मोठ्या प्रमाणात दारू पकडून दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. मात्र काही दिवसानंतर पुन्हा चोरट्या मार्गाने दारूची आयात वाढली आहे.
शहरातील दारूविक्रीला लगाम लावण्याची मागणी
जिल्ह्यात कायद्याने दारूबंदी असली तरी गडचिरोली शहराच्या विविध वॉर्डात चोरीछुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात दारूविक्री सुरू आहे. युवकही दारूच्या आहारी गेले आहेत. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शहरातील दारूविक्रीला आळा घालावा, अशी मागणी सुज्ञ नागरिकांसह महिलांकडून होत आहे. धडक मोहीम राबविण्याची मागणी आहे.

Web Title: 86 thousand foreign liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.