८६ हजारांची विदेशी दारू जप्त, एसडीपीओंच्या पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 07:11 PM2018-02-22T19:11:43+5:302018-02-22T19:11:56+5:30
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोलीचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र जगदाडे यांनी आपल्या सहकारी कर्मचा-यांसह खरपुंडी नाक्याजवळ चारचाकी वाहनाला अडवून या वाहनातून ८६ हजार ४०० रूपयांची देशी, विदेशी दारू गुरूवारी जप्त केली.
गडचिरोली - मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोलीचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र जगदाडे यांनी आपल्या सहकारी कर्मचा-यांसह खरपुंडी नाक्याजवळ चारचाकी वाहनाला अडवून या वाहनातून ८६ हजार ४०० रूपयांची देशी, विदेशी दारू गुरूवारी जप्त केली.
याप्रकरणी दारूविक्रेता प्रशांत ऊर्फ पिंटू मंडल (३२) रा. रामनगर, गडचिरोली याला अटक करून त्याचेवर मुंबई दारूबंदी कायद्याचे कलम ६५ (अ) व ९८ (क) अन्वये गडचिरोेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक जगदाडे यांना अशी माहिती मिळाली की, प्रशांत ऊर्फ पिंटू मंडल हा एमएच-३१-सीएम-४९४३ क्रमांकाच्या वाहनाने देशी, विदेशी दारूची वाहतूक आरमोरीकडून गडचिरोलीकडे करीत असल्याची माहिती मिळाली. सदर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांना पोलीस उपनिरीक्षक जगदाडे यांना दिली. त्यानंतर जगदाडे यांनी आपल्या सहकारी पोेलीस हवालदार नरूले, नाईक पोलीस शिपाई कोहपरे यांना घेऊन आरमोरी मार्गावर पाळत ठेवली. दरम्यान आरमोरीवरून एमएच-३१-सीएम-४९४३ क्रमांकाचे वाहन येताना दिसले. या वाहनाला खरपुंडी नाक्यावर थांबवून वाहनचालकाचे नाव विचारले असता, प्रशांत ऊर्फ पिंटू मंडल असे त्यांनी सांगितले. वाहनातून देशी, विदेशी कंपनीच्या १८० मिली मापाच्या २८८ निपा आढळून आल्या. या दारूची किंमत ८६ हजार ४०० रूपये आहे. तर वाहनाची किंमत १ लाख ५५ हजार रूपये आहे.