८ जूनला कोकडी येथे दमा औषधी वितरण
By admin | Published: May 29, 2014 02:16 AM2014-05-29T02:16:27+5:302014-05-29T02:16:27+5:30
देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथील प्रसिध्द वैद्यराज प्रल्हाद कावळे हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी ..
तुळशी : देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथील प्रसिध्द वैद्यराज प्रल्हाद कावळे हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी म्हणजे ८ जूनला सकाळी ११ ते रात्री १२ वाजेपर्यंत रूग्णांना मासोळीतून नि:शुल्क दमा औषधी वितरीत करणार आहेत. या दिवशी कोकडी येथे विदर्भातील दमा रूग्णांचा कुंभमेळा भरणार आहे. वैद्यराज प्रल्हाद कावळे गेल्या १0-१२ वर्षापासून सतत कोकडी येथे आपल्या स्वगावी हजारो दमा रूग्णांना मासोळीतून नि:शुल्क दमा औषधी देऊन आरोग्य सेवा देत आहेत. दरवर्षी ते मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी दमा औषधी वितरीत करतात. एकाच दिवशी दमा औषधीचे वितरण होत असल्याने कोकडी येथे विदर्भासह महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, छत्तीसगड व अन्य राज्यातील लाखो दमा रूग्ण येतात. यासाठी गावातील नागरिकही आवश्यक ते सर्व सहकार्य करतात. विशेष म्हणजे गावातील नागरिकच मासोळी उपलब्ध करून देतात. पोलीस प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. तालुका प्रशासनासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही या उपक्रमासाठी हातभार लावतात. सकाळी ११ वाजतापासून रात्री १२ वाजेपर्यंत दमा रूग्णांचा ओघ या ठिकाणी कायम दिसतो. वैद्यराज प्रल्हाद कावळे यांच्या दमा औषधीने हजारो दमा रूग्ण बरे झाले आहेत. कावळे यांच्या औषधीने पूर्णत: बरे झाल्याच्या प्रतिक्रिया अनेक दमा रूग्णांनी व्यक्त केल्या आहेत.