९५ हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:12 AM2018-08-26T00:12:49+5:302018-08-26T00:14:46+5:30

अन्न व औषध प्रशासन विभागाने तालुक्यातील पोटेगाव-राजुरी दरम्यान सापळा रचून सुमारे ९४ हजार ९५० रूपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. छत्तीसगड राज्यातून पोटेगाव मार्गे गडचिरोली तालुक्यात दारू आणली जात असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली.

9 5 thousand fragrant tobacco seized | ९५ हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त

९५ हजारांचा सुगंधित तंबाखू जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देपोटेगावजवळ सापळा : अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अन्न व औषध प्रशासन विभागाने तालुक्यातील पोटेगाव-राजुरी दरम्यान सापळा रचून सुमारे ९४ हजार ९५० रूपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे.

छत्तीसगड राज्यातून पोटेगाव मार्गे गडचिरोली तालुक्यात दारू आणली जात असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन नागपूरचे सहआयुक्त केकरे, अन्न व औषध प्रशासन गडचिरोलीचे सहायक आयुक्त कांबळे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर, नमूना सहायक तुकाराम गोडे, पोटेगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, पोलीस उपअधीक्षक चौगावकर यांनी पोटेगाव-राजुरी मार्गावर सापळा रचला. दादाजी उठ्ठलवार, मिथून बांबोळे व विनोद मडावी हे छत्तीसगड राज्यातून दुचाकीने सुगंधित तंबाखू आणत होते. दोन्ही दुचाक्या थांबवून तपासणी केली असता, दोन्ही दुचाकींवर ७७ हजार २५० रूपये किमतीचा गुटखा तंबाखू, ७ हजार रूपये किमतीचा इगल तंबाखू, १ हजार ७०० रूपये किमतीचा विना लेबल तंबाखू, ९ हजार रूपये किमतीचा प्रिमियम तंबाखू आढळून आला. दुचाकी व तंबाखू जप्त करण्यात आला आहे.
सदर तंबाखू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला जाणार आहे. त्याचे रिपोर्ट आल्यानंतर गुन्हा दाखल करून न्यायालयात प्रकरण दाखल केले जाणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईमुळे सुगंधित तंबाखू विक्रेते व दुकानदार धास्तावले आहेत.

Web Title: 9 5 thousand fragrant tobacco seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.