९५० विद्यार्थी घेताहेत व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:42 PM2019-04-29T22:42:54+5:302019-04-29T22:43:13+5:30

उन्हाळ्याच्या सुट्या सत्कार्मी लागाव्या यासाठी शिक्षण विभागाने देसाईगंज तालुक्यातील २५ शाळांमध्ये २० ते ३० एप्रिल दरम्यान समर कॅम्प हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमात सुमारे ९५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ज्या समर कॅम्पसाठी शहरात हजारो रुपये मोजावे लागतात, अशा प्रकारचेच कॅम्प आता जिल्हा परिषद शाळेत मोफत आयोजित केले आहेत. शिक्षण विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

9 50 students taking lessons in personality development | ९५० विद्यार्थी घेताहेत व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे

९५० विद्यार्थी घेताहेत व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे

Next
ठळक मुद्देग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम : देसाईगंज तालुक्यातील २५ जि.प. शाळांचा सहभाग

अरविंद घुटके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
किन्हाळा/मोहटोला : उन्हाळ्याच्या सुट्या सत्कार्मी लागाव्या यासाठी शिक्षण विभागाने देसाईगंज तालुक्यातील २५ शाळांमध्ये २० ते ३० एप्रिल दरम्यान समर कॅम्प हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमात सुमारे ९५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ज्या समर कॅम्पसाठी शहरात हजारो रुपये मोजावे लागतात, अशा प्रकारचेच कॅम्प आता जिल्हा परिषद शाळेत मोफत आयोजित केले आहेत. शिक्षण विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
देसाईगंज तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३४ व नगर परिषदेच्या ८ अशा एकूण ४२ शाळा आहेत. खासगी व्यवस्थापनाच्या ३० शाळा अशा देसाईगंज तालुक्यात एकूण ७२ शाळा आहेत. यातील जिल्हा परिषदेच्या २५ शाळांमध्ये समर कॅम्प हा उपक्रम पाचवी ते सावीच्या विद्यार्थ्यांकरिता राबविला जात आहे.
शाळांना अधिकृत सुट्या २ मेपासून लागतात. मात्र एप्रिलमध्ये परीक्षा झाल्यानंतर बहुतांश विद्यार्थी शाळेमध्ये येतच नाही. ११ एप्रिल रोजी यावर्षी निवडणूक असल्याने शिक्षकांनी लवकरच परीक्षा आटोपल्या. निवडणुकीचे काही दिवस धकाधकीचे गेले. निवडणुकीचे काम आता आटोपले असल्याने शिक्षकांनी पुन्हा विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरूवात केली आहे. विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण व मनोरंजनात्मक उपक्रम राबविल्यास ते शाळेत येतील, या उद्देशाने समर कॅम्पचे आयोजन केले जात आहे. देसाईगंज केंद्राने राबविलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले आहे. सदर उपक्रम देसाईगंजचे गटशिक्षणाधिकारी डॉ. पितांबर कोडापे यांच्या मार्गदर्शनात गट समन्वयक ब्रह्मानंद उईके, केंद्र प्रमुख विजय बन्सोड, संजय कसबे, विवेक बुध्दे, अंबादास आमनेर, विषय साधन व्यक्ती अरविंद घुटके, राजेंद्र बांगरे, रामकृष्ण राहांगडाले, रमाबाई सहारे, अल्का सोनेकार, वैशाली खोब्रागडे, रणजित चौधरी, केदार बन्सोड हे शिबिरावर लक्ष ठेवून आहेत. यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनीही महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली आहे.
शिबिरातील उपक्रम
बोला तुम्ही ऐकतो आम्ही, कथाकथन, कविता तयार करणे, सुलभ पध्दतीने गणितीय प्रक्रिया करणे, चला छंद जोपासूया, भेंड्या खेळणे, जुडो कराटे, विविधांगी डॉन्स शिकविणे, डोळ्यास पट्टी लावून रंगांची ओळख करणे, स्पोकन इंग्लिश, हस्ताक्षर स्पर्धा, योगा, कागदी क्राप्ट, चित्रकला आदी उपक्रम राबविले जात आहेत. केवळ त्याच शाळेच्या शिक्षकांवर अवलंबून न राहता. त्या-त्या विषयात पारांगत असलेल्या शिक्षकाला इतर शाळांमध्ये मार्गदर्शक म्हणून पाठविले जात आहे.

Web Title: 9 50 students taking lessons in personality development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.