९० बॉक्स काळा गूळ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 11:51 PM2018-05-03T23:51:35+5:302018-05-03T23:51:35+5:30

येथील एका किराणा दुकानाच्या गोडाऊनमध्ये ९० पेट्या काळा गूळ रात्रीच्या सुमारास उतरविण्यात आल्याची गुप्त माहिती कळताच आष्टी पोलिसांनी गुरूवारी दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास पंचासमक्ष कटरच्या सहाय्याने गोडाऊनचे कुलूप तोडून तेथून काळा गूळ भरलेले ९० बॉक्स जप्त केल्याची कारवाई केली.

 90 box black jug seized | ९० बॉक्स काळा गूळ जप्त

९० बॉक्स काळा गूळ जप्त

Next
ठळक मुद्देआरोपीला अटक : आष्टी पोलिसांची कारवाई, चारचाकी वाहन ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : येथील एका किराणा दुकानाच्या गोडाऊनमध्ये ९० पेट्या काळा गूळ रात्रीच्या सुमारास उतरविण्यात आल्याची गुप्त माहिती कळताच आष्टी पोलिसांनी गुरूवारी दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास पंचासमक्ष कटरच्या सहाय्याने गोडाऊनचे कुलूप तोडून तेथून काळा गूळ भरलेले ९० बॉक्स जप्त केल्याची कारवाई केली.
टाकलेल्या धाडीदरम्यान पोलिसांना गोडाऊनमध्ये खरड्याचे ९० बॉक्स आढळून आले. या गुळाची किंमत ७४ हजार २५० रूपये आहे. या गुळाची वाहतूक करण्यासाठी एमएच-३४-बीजी-०८८६ क्रमांकाचे चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले. ९० बॉक्स गूळ व चारचाकी वाहन मिळून एकूण ७ लाख ७४ हजार २५० रूपयांचा मुद्देमाल आष्टी पोलिसांनी जप्त केला. यातील आरोपी दुकानदार सोनल विलास बोनगिरवार रा. करंजी ता. गोंडपिपरी व चालक लाभासिंग गुरूमिताश्री रंधवा (२५) रा. आष्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक लुकडे, पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाडे, समू चौधरी, पोलीस हवालदार संघरक्षित फुलझेले, नरेश भसारकर, मिलींद एलावार, गाजनन डेंगरे, बाजीराव उसेंडी, मुनेश्वर रात्रे, विनोद गौरकार आदींनी केली.
सदर गूळ जप्ती प्रकरणातील आरोपी सोनल बोनगिरवार फरार झालेला आहे. आष्टी पोलीस त्याच्या मागावर असून या प्रकरणाचा कसून तपास ठाणेदारांच्या नेतृत्वात करीत आहेत.

Web Title:  90 box black jug seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.