देसाईगंज तालुक्यात ९० हजारांचा मुद्देलाम जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:27 AM2021-05-29T04:27:19+5:302021-05-29T04:27:19+5:30
दुचाकीन अवैधरीत्या दारूची वाहतूक हाेत असल्याच्या माहितीवरून पाेलिसांनी देसाईगंज येथे सापळा रचला. यानुसार एमएच ३३ एक्स १२९३ क्रमांकाची ...
दुचाकीन अवैधरीत्या दारूची वाहतूक हाेत असल्याच्या माहितीवरून पाेलिसांनी देसाईगंज येथे सापळा रचला. यानुसार एमएच ३३ एक्स १२९३ क्रमांकाची दुचाकी तसेच देशी दारूच्या ९० मिलि मापाच्या १७५ नग असा १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुचाकीची किंमत ५० हजार रुपये आहे, असा एकूण ६७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आराेपी संजय नानाजी शेंडे व सुरेंद्र देवदास नान्हे दाेघेही राहणार काेकडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच परिसरात १० लिटर माेहफूल दारूसह २०० किलाे माेहफूल सडवा जप्त करण्यात आला. या प्रकरणी २ हजारांची दारू तसेच २० हजारांचा माेहफूल सडवा असा २२ हजाराचा माल पकडला. दाेन्ही गुन्ह्यात एकूण ८९ हजार ५०० रुपयांचा माल ताब्यात घेऊन जप्त करण्यात आला. ही कारवाई देसाईगंज पाेलिसांच्या नेतृत्त्वात डी.बी. स्क्वाडने केली.
===Photopath===
280521\28gad_2_28052021_30.jpg
===Caption===
माेहफूल सडवा नष्ट करताना पाेलीस.