अपेक्षित सरासरीच्या ९३ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:13 AM2021-08-02T04:13:44+5:302021-08-02T04:13:44+5:30

जून महिन्यात २१०.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. या महिन्यात २१४.८ मिमी एवढा पाऊस झाला हाेता. गडचिराेली, एटापल्ली, धानाेरा, ...

93% of the expected average rainfall | अपेक्षित सरासरीच्या ९३ टक्के पाऊस

अपेक्षित सरासरीच्या ९३ टक्के पाऊस

Next

जून महिन्यात २१०.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. या महिन्यात २१४.८ मिमी एवढा पाऊस झाला हाेता. गडचिराेली, एटापल्ली, धानाेरा, देसाईगंज, मुलचेरा, भामरागड हे तालुके वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला हाेता. जुलै महिन्यात सरासरी ४२७.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. मात्र ३७९.८ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. जुलै महिन्यातील अपेक्षित सरासरीच्या तुलनेत केवळ ८८.८ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील तलाव केवळ ५० टक्केच भरले आहेत. त्यामुळे शेतकरी अजूनही माेठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.

बाॅक्स ......

हलक्या धानाची मुदत संपली

ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही असे शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या धानाची लागवड करतात. याला हलके धान असे संबाेधले जाते. यावर्षी जून महिन्यात अगदी सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धानाचे पऱ्हे वेळेवर टाकण्यात आले. मात्र त्यानंतर पावसाने हुलकावणी दिली. परिणामी धान राेवणीला वेळेवर सुरूवात हाेऊ शकली नाही. हलक्या धानाची राेवणी पऱ्हे टाकणीपासून एक महिन्याच्या कालावधीत हाेणे आवश्यक आहे. मात्र आता दीड ते दाेन महिन्यांचा कालावधी लाेटत चालला आहे. हलके धान गर्भात येण्याच्या मार्गावर असल्याने अनेकांनी हलके धान न राेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बाॅक्स .....

चार महिन्याच्या सरासरीच्या ४७ टक्के पाऊस

गडचिराेली जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत १२५४ मिमी पाऊस पडतो. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यात ५९४ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या हे प्रमाण ४७.३६ टक्के एवढे आहे. म्हणजेच अजूनही ५० टक्के पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. ऑगस्ट महिन्यात बऱ्यापैकी पाऊस पडतो. त्यानंतर मात्र सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी हाेते.

बाॅक्स ....

तालुकानिहाय पाऊस

तालुका पाऊस टक्के

गडचिराेली ५८९.९ ८०.५

कुरखेडा ६५५९.३ ८५.७

आरमाेरी ५२९.४ ८५.५

चामाेर्शी ५२३.८ १०६.२

सिराेंचा ६६३.८ १२१.३

अहेरी ५७७.९ ९१.०

एटापल्ली ५६७.१ ८२.०

धानाेरा ५५२.५ ६९.०

काेरची ६६२.१ ८९.९

देसाईगंज ६५५.३ ९६.३

मुलचेरा ५११.२ ८०.७

भामरागड ६४३.३ ९६.२

सरासरी ५९४.६ ९३.१

Web Title: 93% of the expected average rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.