आलापल्लीत ९७ रक्तदात्यांचे रक्तदान
By admin | Published: October 2, 2016 01:59 AM2016-10-02T01:59:35+5:302016-10-02T01:59:35+5:30
जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांच्या ५० व्या जन्मोत्सवानिमित्त आलापल्ली येथील श्रीराम मंदिरात शनिवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले.
दीपक आत्राम यांची उपस्थिती : नरेंद्रचार्य महाराज सेवा समितीचा पुढाकार
आलापल्ली : जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांच्या ५० व्या जन्मोत्सवानिमित्त आलापल्ली येथील श्रीराम मंदिरात शनिवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण ९७ रक्तदात्यांनी स्वच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
या शिबिराचे उद्घाटन माजी आ. दीपक आत्राम यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार होते. प्रमुख अतिथी म्हणून अहेरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, आलापल्लीचे उपवनसंरक्षक सी. बाला, वनपरिक्षेत्राधिकारी यशवंत नागुलवार, एच. जी. मडावी, प्रभाकर आत्राम, टी. चंद्रशेखर, नरेंद्रचार्य महाराज सेवा समितीचे अध्यक्ष विजय खरवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, नगरसेविका वर्षा ठाकरे, कोमटी समाज संघटनेचे अध्यक्ष साईबाबा भटपल्लीवार, पोलीस उपनिरीक्षक सी. एल. कोेटेकर, व्यापारी संघटनेचे दिलीप बिरेल्लीवार, मुनेश्वर हडपे, व्यंकटेश मद्देर्लावार, मुरली परकीवार, महेश मुक्कावार, गजानन रामटेके, मंगेश परसावार, अभियंता मुके, बाबुराव मद्देर्लावार, देवेंद्र वासेकर आदी उपस्थित होते.
रक्तदात्यांनी दिलेले रक्त गरजू रूग्णांना तसेच सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना उपयोगी पडणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करावे, तसेच नरेंद्रचार्य महाराज सेवा समितीचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी काम करावे, असे माजी आ. दीपक आत्राम यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी ठाणेदार संजय मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, जि. प. सभापती अजय ंकंकडालवार यांनीही मार्गदर्शन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, डॉ. अनुपमा बिश्वास, कर्मचारी सरिता वाघ, शिरीन कुरेशी, प्रीती आत्राम, निर्मला जक्कावार, शुभांगी वाडके, शरद बांबोळे, गोपाल महतो, मेहराज शेख तसेच नरेंद्रचार्य महाराज सेवा समितीचे किशोर सहारे, संजय खरवडे, आदित्य खरवडे, दिगांबर खतवार, अनिकेत खरवडे, नितीन खरवडे, गौरव लुथडे, सरस्वती घुमडे, आरती सरोते, छाया लुथडे, वासेकर आदींनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय खरवडे, संचालन संतोष पडालवार यांनी केले तर आभार पिदुरकर यांनी मानले. (वार्ताहर)