९९७ झाडांची होणार कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 10:57 PM2018-03-11T22:57:33+5:302018-03-11T22:57:33+5:30

मूल ते गडचिरोलीपर्यंत ९३० क्रमांकाच्या राष्टÑीय महामार्गाच्या कामाला सुरूवात झाली आहे. वैनगंगा नदी ते इंदिरानगरपर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान ९९७ झाडे रस्त्यावर असल्याने....

99 7 trees will be slaughtered | ९९७ झाडांची होणार कत्तल

९९७ झाडांची होणार कत्तल

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग : वन विभागामार्फत सर्वेक्षण, वैनगंगा नदीपासून कामाला सुरुवात

दिगांबर जवादे।
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : मूल ते गडचिरोलीपर्यंत ९३० क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरूवात झाली आहे. वैनगंगा नदी ते इंदिरानगरपर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान ९९७ झाडे रस्त्यावर असल्याने ही झाडे तोडली जाणार आहेत. या संदर्भातील कार्यवाही वन विभागाने सुरू केली आहे.
गडचिरोली-चंद्रपूर या राज्य महामार्गाला मागील वर्षी केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. चंद्रपूर ते गडचिरोली-धानोरा-मुरूमगाव-छत्तीसगड राज्याची सीमेपर्यंत एकच राष्ट्रीयय महामार्ग आहे. एवढे काम एकाच कंत्राटदाराला व एकाचवेळी करणे शक्य नसल्याने या कामाचे तुकडे पाडण्यात आले आहेत. त्यापैकी मूल ते गडचिरोलीपर्यंतचा एक तुकडा असून या कामाला सुरूवात झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाडजवळून कामाला सुरूवात झाली होती. दोन महिन्यात सदर काम गडचिरोली जिल्ह्यातील पुलखलपर्यंत आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावलीजवळील चकपीरंजी गावापर्यंत काम पोहोचले आहे. या मार्गाचे रूंदीकरण केले जात आहे. मार्गाच्या बाजुला असलेली झाडे कापावी लागणार आहे. यासाठी वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणादरम्यान ९९७ झाडे रस्त्यात सापडत असल्याने सदर झाडे तोडली जाणार आहेत. नगर परिषद क्षेत्रात झाडे तोडण्याबाबत परवानगी देण्याचा अधिकार नगर परिषदेला आहे. तर ग्रामपंचायत क्षेत्रातील झाडे ग्रामपंचायतीच्या परवानगीनंतर तोडली जाणार आहेत. इतर झाडांना वन विभाग परवानगी देणार आहे. त्याबाबतची कार्यवाही वन विभागाने सुरू केली आहे.
या प्रजातीची झाडे तोडणार
वैनगंगा नदी ते गडचिरोली शहरातील इंदिरानगरातील वन विभागाच्या नाक्यापर्यंत एकूण ९९७ झाडे तोडली जाणार आहेत. यामध्ये किन्हीची १७ झाडे, पेंटाफार्मची २३८ झाडे, करंजी १३७, मोहा १२, पा.सिरस २८, सिरस १०६, चिंच ६, साग ३९, कॅशीया ५०, निलगिरी १०, बोर ११, बाभूळ ४१, निम २४, हिवर २१०, वड ४ व आंबा, कवट, काटेसावरची प्रत्येकी दोन आदी झाडे तोडली जाणार आहेत.
कार्यवाही सुरू
झाडे तोडण्याची कार्यवाही वन विभागाने सुरू केली आहे. सर्वेक्षणानंतर आता जाहीनामा काढला जाणार आहे. त्यामध्ये एखाद्या खासगी व्यक्तीचे झाड असल्यास त्यावर आक्षेप मागितले जाणार आहेत. आक्षेप स्वीकारल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या परवानगीनंतर झाडे तोडण्याची कार्यवाही केली जाणार आहे. तोडलेल्या झाडांची किंमत ठरविली जाणार आहे. सदर किंमत राष्ट्रीय महामार्ग विभाग संबंधित यंत्रणांना देणार आहे.

Web Title: 99 7 trees will be slaughtered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.