मार्कंडा यात्रेसाठी ९९ बसगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2017 01:50 AM2017-02-13T01:50:02+5:302017-02-13T01:50:02+5:30
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरणार आहे.
नियोजन पूर्ण : यात्रेकरूंचे जत्थे दाखल
लोमेश बुरांडे/संतोष सुरपाम चामोर्शी/मार्र्कंडादेव
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरणार आहे. यात्रेकरूंच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी आगाराने बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. गडचिरोली, अहेरीसह चंद्रपूर, अहेरी, ब्रह्मपुरी, राजूरा, चिमूर, वरोरा या सर्व आगाराच्या मिळून एकूण ९९ बसगाड्या यात्रेकरूंच्या सुविधेसाठी सोडण्यात येणार आहे. सदर यात्रेला २४ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. यात्रा जवळ येऊ लागली असल्याने दुकानदार व यात्रेकरूंचे जत्थे मार्र्कंडादेव येथे दाखल होत आहे.
यात्रेदरम्यान व्यवसाय करण्यासाठी आकाश पाळणे, मिनाबाजार, खेळणीची दुकाने, हॉटेल, घरगुती भांडे व इतर साहित्याचे दुकान, जादूचे खेळ, मौत का कुआ, पुजेच्या साहित्याचे दुकान १५ ते २० दिवस येथे राहतात. मनोरंजनासाठी अनेक खेळाचे प्रयोगही येथे दाखविले जातात. त्यामुळे व्यावसायिक साहित्यासह मार्कंडादेव येथे दाखल होऊन दुकान थाटत आहेत.
एसटीचे विभाग नियंत्रक व्ही. टी. गव्हाळे, विभागीय वाहतूक अधिकारी एन. एस. बेलसरे यांच्या मार्गदर्शनात आगार व्यवस्थापक व्ही. एल. बावणे, बसस्थानक प्रमुख पी. एस. सालोटकर, एस. ए. चौधरी बसफेऱ्यांचे व्यवस्थापन सांभाळणार आहेत.