वाहन व बांबू जाळपोळीत ९९ लाखांचे नुकसान

By Admin | Published: April 15, 2017 01:27 AM2017-04-15T01:27:44+5:302017-04-15T01:27:44+5:30

मक्केपल्ली उपक्षेत्रातील कोठरी नियत क्षेत्रात बांबूची वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर व बांबू डेपोला १२ एप्रिल रोजी नक्षल्यांनी आग लावली.

99 lakhs loss in vehicle and bamboo fuel | वाहन व बांबू जाळपोळीत ९९ लाखांचे नुकसान

वाहन व बांबू जाळपोळीत ९९ लाखांचे नुकसान

googlenewsNext

पोलिसांत तक्रार दाखल : कोठारी वन परिक्षेत्रातील घटना
घोट : मक्केपल्ली उपक्षेत्रातील कोठरी नियत क्षेत्रात बांबूची वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर व बांबू डेपोला १२ एप्रिल रोजी नक्षल्यांनी आग लावली. या आगीत एकूण ९८ लाख ६१ हजार २३४ रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्याचे वन विभागाने केलेल्या पंचनाम्यानंतर दिसून आले आहे.
कोठरी जंगलात २६ फेब्रुवारीपासून बांबू कटाईचे काम सुरू करण्यात आले होते. दोन शासकीय ट्रक, तीन खासगी ट्रॅक्टरच्या सहाय्याने कटाई केलेल्या बांबूची डेपोवर वाहतूक केली जात होती. १२ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास कोटरीपासून पाच किमी अंतरावर दोन डोगंरांच्या मध्यभागी असलेल्या जंगलात २० ते २५ च्या संख्येत असलेल्या नक्षल्यांनी दोन ट्रक व दोन ट्रॅक्टरला आग लावली. याबाबतची माहिती ट्रक ड्रायव्हर शेख हैदर शेख यांनी वन परिक्षेत्र कार्यालय घोट येथे दिली. या जाळपोळीत एमएच ३४ एबी ५८६४ व एमएच ३४ एबी ६००३ क्रमांकाचे प्रत्येकी १४ लाख २७ हजार ५०० रूपये किमतीचे दोन शासकीय ट्रक जळाले आहेत. या दोन ट्रकची किमत २८ लाख ५५ हजार रूपये होते. या ट्रकमध्ये भरून असलेल्या ४ हजार ८५० रूपयांचा बांबूही जळून खाक झाला आहे. एमएच ३४ एपी १७३७ क्रमांकाचे ट्रॅक्टर व त्यामधील १ हजार १०० बांबू, एमएच ३४ एल ८१७१ क्रमांकाचा ट्रॅक्टर व त्यामधील १ हजार १०० बांबू असे एकूण दोन ट्रॅक्टरमधील ७ हजार ५० रूपये किमतीचे बांबू व २ लाख ६७ हजार ९०० रूपये किमतीचे ट्रॅक्टर जळाले आहेत. या सर्व मालाची किमत ४४ लाख ७६ हजार ५०० रूपये होते. एमएच ३३ एफ १७२९ क्रमांकाची ट्रॅक्टर जंगलात पंक्चर अवस्थेत उभी होती. याही ट्रॅक्टरला नक्षल्यांनी आग लावली. या ट्रॅक्टरची अंदाजे किमत ६ लाख ७६ हजार ८०० रूपये एवढी होते. ट्रॅक्टरमध्ये भरलेले १५० नग बांबूची किमत ४३ हजार ५०० रूपये एवढी होते. बांबू व ट्रॅक्टरही जळाला आहे. याबाबतची तक्रार वनपाल मोरेश्वर नानाजी कुद्रवार यांनी पोलीस मदत केंद्र घोट येथे दाखल केली आहे. (वार्ताहर)

चार बांबू डेपोला आग
ट्रॅक्टर व ट्रकची जाळपोळ केल्यानंतर नक्षल्यांनी बांबू डेपोलाही आग लावली. डेपो क्रमांक १ मध्ये १८ हजार १० नगर बांबू, डेपो क्रमांक २ मध्ये ८८ हजार ७५०, डेपो क्रमांक ३ मध्ये ९ हजार ९३३ व डपो क्रमांक ४ मध्ये ६ हजार ५० असे एकूण १ लाख २२ हजार ७४२ नग बांबू ठेवला होता. याची किमत ४६ लाख ६४ हजार २३४ रूपये एवढी होते. सदर बांबू जळून खाक झाला आहे.

Web Title: 99 lakhs loss in vehicle and bamboo fuel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.