९९ ग्रामपंचायतीत १० नामांकन अर्ज!

By admin | Published: June 16, 2014 11:29 PM2014-06-16T23:29:00+5:302014-06-16T23:29:00+5:30

निवडणूक आयोगाने जिल्हाभरातील २ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व ९७ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ७ जूनपर्यंत नामाकंन अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती.

99 nomination forms for 99 gram panchayat! | ९९ ग्रामपंचायतीत १० नामांकन अर्ज!

९९ ग्रामपंचायतीत १० नामांकन अर्ज!

Next

नक्षल्यांची दहशत : ९७ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक
दिगांबर जवादे - गडचिरोली
निवडणूक आयोगाने जिल्हाभरातील २ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व ९७ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ७ जूनपर्यंत नामाकंन अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. या एकूण ९९ ग्रामपंचायतीत सदस्यांच्या रिक्त जागांसाठी केवळ १० नामाकंन भरण्यात आले आहेत. नक्षल्यांकडून लोकप्रतिनिधींची केली जाणारी हत्या व त्या गावामध्ये त्या प्रवर्गाचा उमेदवार नसणे हे कारण माणले जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४६७ ग्रामपंचायती आहेत. यापैकी निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायती अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागामध्ये मोडतात. नक्षल्यांचा लोकशाही व्यवस्थेस विरोध असल्याने ते निवडणुकीचा प्रचंड प्रमाणात राग करतात. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींवरीही हल्ले करतात. आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधींना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिक निवडणुकीमध्ये सहजासहजी सहभाग घेत नाही. एवढेच नाही तर कोतवाल, पोलीस पाटील, सरपंच पद सांभाळण्यासही तयार होत नाही. अहेरी, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, भामरागड, सिरोंचा, कोरची, एटापल्ली या तालुक्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे. मात्र रोटेशननुसार इतरही प्रवर्गांना ग्रामपंचायतमध्ये आरक्षण दिले जाते. कधी-कधी या प्रवर्गाचा नागरिकच त्या ग्रामपंचायतीमध्ये राहत नसल्याने अर्ज भरल्या जात नाही. पर्यायाने त्या ठिकाणची जागा शिल्लक राहते.
निवडणूक आयोगाने अहेरी तालुक्यातील येडमपल्ली व रेगुलवाही या दोन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक व त्याच तालुक्यातील इतर २१ ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येडमपल्ली ही ग्रामपंचायत नक्षलग्रस्त भागात येते नुकत्याच लोकप्रतिनिधींच्या हत्या करण्यात आल्या. नागरिकांमध्ये दहशत असून ग्रामपंचायत सदस्य म्हणून जीवाची जोखीम उचलण्याची त्यांची तयारी नाही. या ग्रामपंचायतीमध्ये एकही नामांकन अर्ज दाखल करण्यात आला नाही. रेगुलवाही येथे केवळ तीन नागरिकांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. इतर २१ ठिकाणी मात्र एकही नामाकंन अर्ज दाखल करण्यात आला नाही. एटापल्लीच्या पं.स. सभापती ललिता मट्टामी यांचे पती घिसू मट्टामी यांची १० दिवसापूर्वीच हत्या करण्यात आली. याच तालुक्यातील सुमारे २३ ग्रामपंचायतीमध्ये पोट निवडणूक घेण्यात येत आहे. मात्र एकही नामांकन अर्ज आला नसल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

Web Title: 99 nomination forms for 99 gram panchayat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.