फळ पिकांची ९९ हजार कलमे उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:18 AM2019-06-13T00:18:41+5:302019-06-13T00:19:38+5:30

गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. धान उत्पादक शेतकऱ्याला फळ पिकांकडे वळविण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. शेतकºयाला फळ पिकांची कलमे, रोपटे उपलब्ध करून देऊन त्याला योग्य मार्गदर्शन केल्यास शेतकरी फळ पिकांच्या लागवडीकडे वळू शकतो.

99 thousand pieces of fruit crops available | फळ पिकांची ९९ हजार कलमे उपलब्ध

फळ पिकांची ९९ हजार कलमे उपलब्ध

Next
ठळक मुद्देरोहयोचा उपक्रम : ७३९ हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. धान उत्पादक शेतकऱ्याला फळ पिकांकडे वळविण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्याला फळ पिकांची कलमे, रोपटे उपलब्ध करून देऊन त्याला योग्य मार्गदर्शन केल्यास शेतकरी फळ पिकांच्या लागवडीकडे वळू शकतो. ही बाब लक्षात घेऊन महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध फळ झाडांची ९९ हजार कलमे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. या पिकाला मोठ्या प्रमाणात सिंचनाची गरज भासते. त्यामुळे ज्या शेतकºयांकडे सिंचनाची गरज आहे, असेच शेतकरी धानपिकाची लागवड करतात. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, असे शेतकरी त्यांची शेतजमीन पडिक ठेवतात. या जमिनीत फळझाडांची लागवड करणे शक्य आहे. शेतात एक विहीर जरी खोदली तरी फळबाग लावणे शक्य होते. शासनाच्या विविध योजनांमार्फत शेतकऱ्यांना विहीरही खोदून दिली जाते. एकंदरीतच फळ पिकांच्या लागवडीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्यास पडिक असलेली हजारो एकर शेतजमीन पिकाखाली येण्यास मदत होईल. तसेच फळबाग लागवडीतून धानपिकाच्या शेतीपेक्षा अधिक उत्पादन मिळते.
येथील शेतजमीन व वातावरण फळ लागवडीस पोषक असले तरी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. तसेच फळबाग लागवडीची जोखीम उठविण्यास शेतकरी तयार नाही. त्यामुळे शेतकरी फळ पिकांची लागवड करीत नाही. शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाल्यास मात्र शेतकरी फळ पिकांची लागवड करू शकेल.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत २०१८-१९ या वर्षात ९४ हेक्टरवर विविध फळझाडांची लागवड झाली आहे. याही वर्षी शेतकऱ्यांना फळझाडांची कलमे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना फळझाडांची कलमे वितरित करायची आहेत, त्यांची निवड यापूर्वीच करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी फळझाड लागवडीसाठी सदर शेतकऱ्यांनी त्यांची शेतजमीन तयार करून ठेवली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात सुमारे ९९ हजार फळझाडांची कलमे व रोपे उपलब्ध आहेत. पावसाळ्यात त्यांचे वितरण शेतकºयांना केले जाणार आहे.

आंबा पिकाला सर्वाधिक पसंती
आंबा पिकासाठी गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण योग्य आहे. तसेच जमीन सुद्धा सुपीक आहे. त्यामुळे आंबा पिकाचे उत्पादन चांगले होते. परिणामी शेतकऱ्यांकडून आंबा पिकांच्या रोपट्यांची मागणी सर्वाधिक होते. २०१९-२० या आर्थिक वर्षात सुमारे ३५० हेक्टरवर आंबा पिकाची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आंबा झाडांची ३३ हजार कलमे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यानंतर काजू, चिकू, कागदी लिंबू, आवळा या फळझाडांची प्रत्येकी ५० हेक्टर क्षेत्रावर लागवड यावर्षी करण्याचे लक्षांक ठेवण्यात आले आहे.
चिकु पिकाचेही गडचिरोली जिल्ह्यात चांगले उत्पादन होते. गडचिरोली जिल्ह्यातील चिकुचा दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे चिकुला नागपूर बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे. गडचिरोलीचे चिकू हे नागपूर बाजारपेठेत आपली विशेष ओळख निर्माण केली आहे.

मागील वर्षी ९५ हेक्टरवर फळझाडांची लागवड
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मागील वर्षी सुमारे ९४.७७ हेक्टर क्षेत्रावर फळझाडांची लागवड करण्यात आली. विविध रोपवाटिकांमधून २ हजार ३०० रोपटे लावण्यात आले. ६६ शेतकºयांनी फळझाडांची लागवड केली आहे. मागील वर्षी सुद्धा सर्वाधिक ९०.७९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड झाली आहे. त्यानंतर २.१४ हेक्टर क्षेत्रावर फणस, ०.८४ हेक्टर क्षेत्रावर कागदी लिंबू तर १ हेक्टर क्षेत्रावर शेवगा पिकाची लागवड झाली आहे.

Web Title: 99 thousand pieces of fruit crops available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.