रानटी हत्तींचा कळप आला, १४ घरे पाडून गेला; भीतीपोटी मुलाबाळांसह नागरिकांची धावाधाव

By संजय तिपाले | Published: August 2, 2023 05:05 PM2023-08-02T17:05:13+5:302023-08-02T17:07:03+5:30

आंबेझरी गावात धुडगूस

A herd of wild elephants demolished 14 houses in Ambezari village of gadchiroli dist | रानटी हत्तींचा कळप आला, १४ घरे पाडून गेला; भीतीपोटी मुलाबाळांसह नागरिकांची धावाधाव

रानटी हत्तींचा कळप आला, १४ घरे पाडून गेला; भीतीपोटी मुलाबाळांसह नागरिकांची धावाधाव

googlenewsNext

गडचिरोली : गोंदिया जिल्ह्यात सीमावर्ती भागात धुडगूस घालणाऱ्या रानटी हत्तींच्या कळपाने २ ऑगस्ट रोजी पहाटे आंबेझरी (ता.कुरखेडा) येथे १४ घरे जमीनदोस्त केली. १८ ते २० हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातल्याने नागरिकांना मुलाबाळांसह जीवाच्या भीतीने घरे सोडून धावाधाव करावी लागली. या घटनेने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
         
आंधळी(सोनपूर) गट ग्रामपंचायत अंतर्गत फक्त ३६ कुटुंब असलेला आंबेझरी हे गाव  डोगंर व घनदाट जंगलाने वेढलेले आहे. आदिवासींच्या या गावात २ ऑगस्ट रोजी पहाटे १८ ते २० चा संख्येत असलेल्या रानटी हत्तीचा कळपाने  हल्ला चढवला.घरांची नासधूस करण्यास सूरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने  घाबरलेल्या नागरिकांनी मुलाबाळांसह घरातून बाहेर पळ काढला. काही वेळानंतर स्वत:ला सावरत गावकऱ्यांनी टेंभे पेटवत हत्तीच्या कळपाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न  केला.मात्र, हत्तींनी गावकऱ्यांना दाद न देता धुडगूस सुरुच ठेवला. माहिती मिळताच   पुराडा वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी दिघोडे यांनी गावात भेट दिली व पंचनामा केला.

डोक्यावरचे छत गेले, धान्याचीही नासाडी

या हल्ल्यात अनेक घरांची पडझड झाली. संसारोपयोगी साहित्यासह धान्याचे नुकसान झाले.  त्यामुळे येथील गरीब कुटुंबांना बेघर होण्याची वेळ ओढावली. अतिदुर्गम गाव असल्याने येथे चार ते सहा महिन्यांचे धान्य साठा करुन ठेवतात. मात्र, डोक्यावरचे छत तर गेलेच, पण धान्याचीही नासाडी झाल्याने गावकरी हैराण झाले आहेत.  

यांचे झाले नुकसान

आंबेझरी येथील आनंदराव हलामी, बारीकराव मडावी, आसाराम मडावी, भाऊदास मडावी, तुकाराम मडावी, सखाराम मडावी, चून्नीलाल बूद्धे, दिलीप मडावी, लालाजी मडावी, धर्मराव हलामी, शामराव काटेंगे, यशवंत हलामी, रैसू हलामी, मंगरू हलामी यांचा घराची नासधूस झाली आहे. शासनाने अन्नधान्याची सोय करुन भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: A herd of wild elephants demolished 14 houses in Ambezari village of gadchiroli dist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.