शेळ्यांची शिकार करण्याच्या प्रयत्नात बिबट्या विहिरीत

By संजय तिपाले | Published: July 16, 2024 12:07 PM2024-07-16T12:07:06+5:302024-07-16T12:07:42+5:30

जोशीटोला गावातील घटना: बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभाग कामाला

A leopard in a well trying to hunt goats | शेळ्यांची शिकार करण्याच्या प्रयत्नात बिबट्या विहिरीत

A leopard in a well trying to hunt goats

गडचिरोली: आधी गायीवर हल्ला, त्यानंतर तीन कोंबड्यांचा फडशा पाडून शेळ्यांची शिकार करण्यासाठी झेपावलेला बिबट्या विहिरीत कोसळला. ही घटना कुरखेडा तालुक्यातील जोशीटोला येथे १६ जुलै रोजी पहाटे घडली. दरम्यान, बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी आता वनविभाग कामाला लागला आहे. 
 
जोशीटोला गावालगत रघुनाथ बनसोड यांचे शेत आहे. तेथेच त्यांची विहीर असून जवळच गुरांचा गोठाही आहे. १६ जुलै रोजी पहाटे दोन वाजता बिबट्याने त्यांच्या गोठ्यातील गायीवर हल्ला केला. यात गाय जखमी झाली. त्यानंतर तीन कोंबड्यांचा फडशा पाडला. बिथरलेल्या बिबट्याने नंतर शेळ्यांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच दरम्यान अंधारात तो विहिरीत कोसळला.  पहाटे ही बाब शेतकरी बनसोड यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तातडीने वनविभागाला संपर्क केला.  सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

बिबट्याला पाईपाचा आधार
दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा बोलावला. मात्र, विहिरीचा आकार अवघ्या चार फुटांचा आहे. त्यामुळे पिंजरा आत सोडणे कठीण बनले आहे. त्यामुळ छोटा पिंजरा मागवला आहे. तूर्त बिबट्यासाठी लाकडी पाट सोडण्यात आला असून सध्या तो पाईपाला बिलगून बसलेला आहे.
 

Web Title: A leopard in a well trying to hunt goats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.