प्रेमीयुगुल आत्महत्या प्रकरणाला नवे वळण, मुलीच्या वडिलांनीही संपविले जीवन

By संजय तिपाले | Published: October 7, 2024 04:12 PM2024-10-07T16:12:04+5:302024-10-07T16:13:11+5:30

जिल्हा हादरला : दुपारपासून होते बेपत्ता, जंगलात झाडाला घेतला गळफास

A new twist in the couple's suicide case, the girl's father also ended his life | प्रेमीयुगुल आत्महत्या प्रकरणाला नवे वळण, मुलीच्या वडिलांनीही संपविले जीवन

A new twist in the couple's suicide case, the girl's father also ended his life

गडचिरोली: प्रेमीयुगुलाने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मुलचेरा तालुक्यातील लक्ष्मीपूर येथे ६ ऑक्टोबरला उजेडात आली होती. या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलीच्या वडिलांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.  
 

जयदेब समीरण मंडल ( २०, रा. लक्ष्मीपूर), अमेला अमित रॉय ( १८ रा. विजयनगर)  यांच्यात प्रेमसंबंध होते. ५ ऑक्टोबरला दोघेही मध्यरात्री घरातून गायब झाले होते. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही ते आढळले नाहीत.  लक्ष्मीपूर शिवारात एका शेतकऱ्याच्या झोपडीत या दोघांचे एकाच दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळले. दरम्यान, या घटनेची माहिती अमेला हिचे वडील अमित अनिल रॉय (४२) यांना  समजली. त्यानंतर दुपारपासून ते मोबाइल बंद करुन गायब झाले होते. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही ते सापडले नव्हते. अखेर मुलचेरा ठाण्यात ते बेपत्ता असल्याची नोंद केली. पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता त्यांचे शेवटचे लोकेशन गावालगतच्या जंगलात आढळले. 

अखेर ७ रोजी सकाळी त्यांचा मृतदेह   जंगलात एका झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. पो.नि. महेश विधाते यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.

 

मुलीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पाऊल
दरम्यान, अमित रॉय हे शेती व्यवसाय करत. शांत व संयमी म्हणून ते परिचित होते. मुलीने प्रियकरासोबत आत्महत्या केल्याची बातमी कानावर पडल्यापासून ते अस्वस्थ होते. यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
 

Web Title: A new twist in the couple's suicide case, the girl's father also ended his life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.