जावई व मुलाशी भांडणाचा वचपा काढला पत्नीवर; कुऱ्हाडीने घाव घालून केली हत्या

By गेापाल लाजुरकर | Published: July 2, 2023 06:41 PM2023-07-02T18:41:15+5:302023-07-02T18:41:29+5:30

जून महिन्यात जावई व मुलाने मारझाेड केली. ते

A quarrel with son-in-law and son-in-law took revenge on his wife Killed by an ax wound | जावई व मुलाशी भांडणाचा वचपा काढला पत्नीवर; कुऱ्हाडीने घाव घालून केली हत्या

जावई व मुलाशी भांडणाचा वचपा काढला पत्नीवर; कुऱ्हाडीने घाव घालून केली हत्या

googlenewsNext

गडचिराेली : जून महिन्यात जावई व मुलाने मारझाेड केली. तेव्हापासून पत्नी मुलीकडे राहायला गेली. हा राग मनात धरून पतीने जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या पत्नीच्या डाेक्यावर कुऱ्हाडीने घाव घालून तिची हत्या केली तर प्रतिकार करणाऱ्या मुलीलासुद्धा गंभीर जखमी केले, ही घटना काेरची तालुक्यातील काेचीनारा येथे रविवार २ जुलै राेजी सकाळी ११:३० वाजता घडली. रेखाबाई प्रीतराम धकाते (४५) असे मृत महिलेचे तर श्यामबाई संजय देवांगण (२७) रा. काेचीनारा असे गंभीर जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे.

रेखाबाई व श्यामबाई ह्या दाेघीही शेजारील आशा भक्ता व संगीता बघवा यांच्यासोबत रविवारी सकाळी सरपण गोळा करण्यासाठी गावालतच्या जंगलात गेल्या होत्या. तेव्हा आरोपी पती प्रीतराम धकाते (४८) हा त्यांच्यावर पाळत ठेवून हाेता. हीच संधी साधून प्रीतरामने रेखाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घातले. यावेळी मुलगी श्यामबाई ही प्रतिकार करण्यासाठी गेली. तेव्हा तिच्या डाव्या हातावर व कमरेवर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. तसेच पत्नीवर घाव घालणे सुरूच ठेवले. याचवेळी जखमी मुलीने पती संजय देवांगण व भाऊ महेशला फोन करून घटनेबाबत माहिती दिली. 

ते येतपर्यंत आरोपी पती प्रीतराम घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेन पसार झाला. यानंतर जखमींना दुचाकीने कोरची ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले; परंतु रेखाबाई हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मुलगी श्यामबाई देवांगण हिला गंभीर अवस्थेत गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले. ह्या घटनेबाबत कोरची पोलिस स्टेशनमध्ये आरोपी प्रीतराम विरोधात कलम ३०२, ३२६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास सहायक पाेलिस निरीक्षक गणेश फुलकवर करीत आहेत.

पत्नी साेबत राहत नसल्याची खुन्नस
जून महिन्यात जावई संजय देवांगण व मुलगा महेश धकाते यांचे आरोपी प्रीतरामशी घरी भांडण झाले होते. यावेळी प्रीतरामला जावई व मुलाने मारझोड केली होती. तेव्हा प्रीतराम हा जखमी जखमी हाेऊन त्याने ब्रह्मपुरी येथील खासगी दवाखान्यात उपचार घेतला हाेता. प्रीतरामने सदर घटनेची तक्रार कोरची पोलिस स्टेशनमध्ये केली होती. तेव्हापासून पत्नी रेखाबाई धकाते गावातीलच जावयाकडे निवासी राहत होती. ती सोबत राहत नसल्याचा राग मनात धरून प्रीतरामने कुऱ्हाडीने पत्नीची हत्या केली.
 

Web Title: A quarrel with son-in-law and son-in-law took revenge on his wife Killed by an ax wound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.