लोहखनीज वाहतूक करणाऱ्या जड वाहनाने घेतला शिक्षकाचा बळी; आलापल्लीत पोलीस चौकीसमोरच चिरडले

By संजय तिपाले | Published: May 20, 2023 03:51 PM2023-05-20T15:51:36+5:302023-05-20T15:52:03+5:30

२० दिवसांत चार जणांनी गमावले प्राण

A teacher was killed by a heavy vehicle transporting iron ore; Crushed in front of police post in Alapalli | लोहखनीज वाहतूक करणाऱ्या जड वाहनाने घेतला शिक्षकाचा बळी; आलापल्लीत पोलीस चौकीसमोरच चिरडले

लोहखनीज वाहतूक करणाऱ्या जड वाहनाने घेतला शिक्षकाचा बळी; आलापल्लीत पोलीस चौकीसमोरच चिरडले

googlenewsNext

गडचिरोली: सूरजागड खाणीतील लोहखनीज वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे सत्र सुरुच आहे. आलापल्ली (ता.अहेरी) येथे पोलिस चौकीसमोरच जड वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षक जागीच ठार झाला. ही घटना २० मे रोजी दुपारी पावणे तीन वाजता घडली.

वसुदेव मंगा कुळमेथे (४५,रा.नागेपल्ली ता.अहेरी)असे मयत शिक्षकाचे नाव आहे. ते एका आश्रमशाळेत कार्यरत होते. ते आलापल्लीहून नागेपल्लीकडे जात होते. आलापल्लीत पोलिस चौकीसमोरच लोहखनीज घेऊन सूरजागडहून आष्टीकडे जाणाऱ्या जड वाहनाने (एमएच ३४ बीझेड-५५८८) दुचाकीला पाठीमागून धडक दिली, यात दुचाकीवरील वसुदेव कुळमेथे हे जागीच गतप्राण झाले. अपघात एवढा भीषण होता की, ट्रक अंगावरुन गेल्याने घटनास्थळी रक्तामांसाचा सडा पडला होता.

दरम्यान, अपघातानंतर ट्रक जागेवरच उभा करुन चालक पोलिस चौकीत हजर झाला. त्यास पोलिसांनी ताब्यातघेतले. त्यानंतर रस्त्यावरील ट्रक बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. वसुदेव कुळमेथे यांचा मृतदेह अहेरी ग्रामीण रुग्णालयात हलविला असून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली. 
 
लोहखनीज वाहतूक उठली जिवावर

एटापल्ली तालुक्यातील सूरजागड पहाडीवरील खाणीतून लोहखनिजाची शेकडो वाहनांतून रोज बेसुमार वाहतूक सुरु आहे. यामुळे अपघात वाढले आहेत. मुरखळा येथे ३० एप्रिलला लोहखनीज वाहतूक करणाऱ्या ट्रकने दोघांचा बळी घेतला होता, त्यानंतर 
चामोर्शी तालुक्यात लोहखनिजाच्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना १४ मे रोजी घडली होती, तर २० मे रोजी शिक्षक वसुदेव कुळमेथे यांचा बळी गेला. सततच्या अपघातांमुळे लोहखनीज वाहतूक सामान्यांच्या जिवावर उठल्याचे दिसून येत असून स्थानिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Web Title: A teacher was killed by a heavy vehicle transporting iron ore; Crushed in front of police post in Alapalli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.